अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:36 IST2025-05-27T18:35:00+5:302025-05-27T18:36:15+5:30
सोलापूर-गोवा व गोवा ते सोलापूर अशी ही सेवा असणार आहे. ही सेवा Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापुरकरांना मिळणार आहे.

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ
आप्पासाहेब पाटील, सोलापूर
कित्येक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या सोलापूरकरांना मंगळवारी दिलासादायक बातमी ऐकण्यास मिळाली. होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून सोलापूर-गोवाविमानसेवेला प्रारंभ होणार आहे. त्यासंदर्भातील तिकीट बुकिंग सुरू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोलापूर-गोवा व गोवा ते सोलापूर अशी ही सेवा असणार आहे. ही सेवा Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापुरकरांना मिळणार आहे. प्लाय ९१ या कंपनीच्या वेबसाईटवर सोलापूर ते गोवा तिकिट बुकिंग करण्यासाठी सुरूवात झाली आहे.
सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट किती?
सोलापूर ते गोवा ३४९१ असे तिकीट असणार असून, ९ जून रोजी पहिले प्रवासी विमान सोलापूरच्या विमानतळावरून उड्डाण करणार आहे. सकाळी ८.५० ला गोव्यातून हे विमान सोलापुरात येणार आहे तर सोलापुरातून सकाळी १०.०५ वाजता विमान गोव्याकडे उड्डाण होणार आहे.
विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापुरातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विमानसेवेमुळे सोलापूरच्या उद्योग, धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
सोलापूरकरांनी तात्काळ आपल्या तिकिटांची नोंदणी करून या ऐतिहासिक उड्डाणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आता सोशल मिडियाच्यामाध्यमातून अनेक संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींनी केले आहे. ही केवळ एक सेवा नाही, तर सोलापूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. बुकिंगसाठी Fly 91 च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या प्रवासाची तयारी करा असेही म्हटले आहे.