छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका विनापरवाना पंढरपूरला आणणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:55 IST2020-07-02T21:54:48+5:302020-07-02T21:55:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका विनापरवाना पंढरपूरला आणणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल...
पंढरपूर : पंढरपूरमध्ये संचारबंदीचा कायदा लागू असताना व आषाढीनिमित्त पंढरपुरात येण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नसताना देखील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपुरात येणाऱ्या दोघांवर व त्यांना सहकार्य करणाऱ्या एका विरुध्द पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, संदीप महादेवराव महिंद (वय ४२, रा. शिरशी, ता.बत्तीस शिराळा, जि. सांगली), योगेश उत्तमराव महिंद (वय २४ ) यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पंढरपूर मध्ये संचारबंदीचे काळात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे जवळ सामाजिक कार्यकर्ते किरण घाडगे (रा. पंढरपूर) हा पण हजर होता. या आपले व इतरांचे जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापनांचा भंग केला आहे. यामुळे त्या तिघांविरुद्ध भादवि कलम ३६९, १८८, ३४ व राष्ट्रीय आपत्ती साथीचे रोग प्रतिबंध अधि. १८९७ चे कलम २,३ प्रमाणे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी करे हे करीत आहेत.