शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा-पंधरा दिवस झाले रोहित्र मिळेना; पाणीसाठा असूनही पिके काेरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:06 IST

महावितरणचे दुर्लक्ष : चांगल्या पावसामुळे नदी-विहिरीत मुबलक पाणीसाठा

सुजल पाटील

सोलापूर : यंदा चांगला पाऊसमान झाल्यामुळे विहिरी, बोअर, नद्या, नाल्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी वेळेवर रोहित्र (ट्रान्सफर्मर) मिळत नसल्याने अनेक पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.  आठ ते पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने पिके कोरडी पडत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात रब्बीबरोबरच खरीपांची मोठया प्रमाणात पेरणी केली जाते. याशिवाय जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्राबरोबरच फळपिकांचेही क्षेत्र वाढले आहे. मागील चार ते पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना यंदा चांगल्या पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे रोहित्रे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील शाखा कार्यालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

तक्रार करूनही प्रतीक्षेतचरोहित्र जळाल्याची तक्रारी स्थानिक कार्यालयात केल्यानंतर तेथील कर्मचारी बघू, करू अशी उत्तरे देतात, त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याला कुठे न्याय मिळतो. पण तक्रार केल्यानतर सुध्दा किमान रोहित्र मिळण्यास किमान १० दिवस लागतातच.

खासगी दलाल गावागावात आम्ही तुम्हाला रोहित्र बदलून देऊ असे सांगून शेतकर्याकडून पैसे उकळणारे खासगी दलाल आता गावागावात दिसू लागले आहेत. त्यांचा महावितरणशी काहीही सबंध नसतानाही हे लोक बिनधास्तपणे शेतकर्याकडून पैसे वसूल करू लागल्याचेही सांगण्यात आले. 

वास्ताविक पाहता कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महावितरण सर्वेातोपरीने प्रयत्न करीत आहे. ऑईल व रोहित्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आमच्याकडे तक्रार आल्यास तीन ते चार दिवसातच आम्ही रोहित्र बदलून देतो.  - ज्ञानदेव पडळकर,  अधीक्षक अभियंता, महावितरण

रोहित्र बंद पडल्यानंतर उन्हाळ्यात किमान महिनाभराचा कालावधी लागत होता. आता त्यात थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तक्रार केल्यानंतर आधी पैसे भरा मगच रोहित्र बदलण्यात येईल असे सांगण्यात येते, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- संजीव पाटील, तक्रारदार शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात