सोलापुरात मृतावस्थेत आढळलं स्त्री जातीचं अर्भक

By रूपेश हेळवे | Updated: August 8, 2023 12:45 IST2023-08-08T12:45:02+5:302023-08-08T12:45:34+5:30

ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. 

Female infant found dead in Solapur | सोलापुरात मृतावस्थेत आढळलं स्त्री जातीचं अर्भक

सोलापुरात मृतावस्थेत आढळलं स्त्री जातीचं अर्भक

सोलापूर : अक्कलकोट येथील दुधनी रेल्वे गेट ते दुधनी गावा जवळ एक स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. 

मंगळवारी पहाटे अक्कलकोट पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालत असताना त्यांना दुधनी रेल्वे गेट ते दुधनी गावात जाताना परमशेट्टी यांच्या शेताजवळ जवळ रस्त्याच्या कडेला गवतात एक स्त्री जातीचे अर्भक आढळले, याची माहिती त्यांनी लगेच वरिष्ठांना देऊन त्या अर्भकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्या अर्भकाला शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवलदार राजू कोळी करत आहेत.
 

Web Title: Female infant found dead in Solapur