शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याकडे 3 हजारांची लाच मागितली, तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:15 IST

शेतकरी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

ठळक मुद्देशेतकरी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.लाचलुचपत विभागाच्या पथकाने वैरागमध्ये सापळा रचून तलाठ्यास अटक घेताना रंगेहात अटक केली.

सोलापूर - शेतकऱ्याकडून 3 हजार रुपयांची लाच घेताना, लाललुचपत प्रतिबंधक विभागाने गाव कामगार तलाठ्यास रंगेहात पडकले. त्यानंतर, तलाठ्यास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या वैराग तालुक्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फेरफार नोंद करण्यासाठी या तलाठ्याने शेतकऱ्याकडे 3 हजारांचा लाच मागितली होती. अस्लम सरदार मलिक शेख असे या तलाठ्याचे नाव असून ते बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे. 

शेतकरी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने 11 गुंठे शेतजमिनीचा व्यवहार केला होता. या व्यवहारानानंतर 7/12 उताऱ्यावर नाव लिहून देण्यासाठी तलाठ्याने शेतकऱ्याकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत जागृत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर, आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने वैरागमध्ये सापळा रचून तलाठ्यास अटक घेताना रंगेहात अटक केली. अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे आणि पुणे विभागाचे दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे, सहा पोलीस उपअधिक्षक निलकंठ जाधवर, पोलीस हवालदार प्रफुल्ल जानराव, उमेश पवार, श्याम सुरवसे यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, अँटी करप्शन विभागकडून नागरिकांना लाच न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार सोलापूर अँटी करप्शन ब्युरो दूरध्वनी क्रमांक 0217-2312668 कडे करण्याचे सूचवले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 ही देण्यात आला आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग