शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

’समाजातील प्रत्येक जण ‘पर्यावरणप्रेमी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:11 IST

माणूस नावाच्या प्राण्याला जगण्याचा जितका अधिकार आहे तितकाच पृथ्वीतलावरच्या प्रत्येक सजीवाला देखील आहे.

ठळक मुद्देआपल्या व्यस्त दैनंदिनीतून थोडासा वेळ काढून पर्यावरणात रमण्याचा अनुभव आपल्याला घेता येणं शक्यप्रत्येक जण निसर्गावर भरभरून प्रेम करणारा आहे, आपल्या कृतीतून त्याची सेवा करणारा आहे

मनमोहक असा गर्द हिरवा निसर्ग प्रत्येकालाच आवडतो. निळ्या आकाशात उडणाºया पक्ष्यांचा थवा पाहण्यात प्रत्येक जण विभोर होऊन जातो. प्रचंड ऊर्जा घेऊन उड्या मारणाºया गायीच्या वासराला किंवा मांजराच्या एका छोट्या पिल्लाला पाहून त्याला गोंजारण्याची मनस्वी इच्छा सर्वांनाच होते.

मन प्रसन्न करणाºया विविध फुलांचा सुगंध प्रत्येकालाच भावतो. दूरवर वाºयाच्या वेगाने धावणारी हरणं पाहून आपण सारेच मंत्रमुग्ध होतो. प्रचंड उन्हामध्ये एखाद्या झाडाखालच्या गारव्याचा थंड अनुभव प्रत्येकालाच आहे. सकाळी उठल्यानंतर घरासमोरच्या वृंदावनावर वाºयाच्या झुळुकीने डुलणाºया तुळशीच्या रोपाला पाहून आपोआपच आपण नतमस्तक होतो. मानवांनी निसर्गाशी जोडलेल्या नात्यांची अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला घेता येतील. मुळात ‘मानव’ हा पर्यावरणाचा एक घटक आहे, त्याची नाळ ही निसर्गाशी जोडलेलीच आहे, म्हणूनच या पृथ्वीतलावरचा प्रत्येक जण ‘पर्यावरणप्रेमी’ आहे, निसर्गप्रेमी आहे. 

माणूस नावाच्या प्राण्याला जगण्याचा जितका अधिकार आहे तितकाच पृथ्वीतलावरच्या प्रत्येक सजीवाला देखील आहे. पृथ्वीवरच्या लाखो प्रकारच्या सजीवांमध्ये माणसासोबतच अनेक प्राणी, पक्षी, सूक्ष्म जीव, झाडेझुडुपे, लतावेली, वनस्पती यांचा समावेश आहे. प्रत्येक सजीव लहानाचं मोठं होऊ पाहतोय. स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं प्रयत्न करतोय. वेगानं पळू पाहतोय आणि मुक्तपणानं उंच-उंच आकाशात संचारू पाहतोय. या सर्व गोष्टी सुलभ आणि सुखकर होण्यासाठी पर्यावरणाचं स्वत:चं एक व्यवस्थापन आहे. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकानं हे व्यवस्थापन अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. 

आधुनिक युगामध्ये मानवाने आपल्या अचाट अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:साठी अनेक गोष्टींचा शोध लावला आणि आपलं जीवन चोहोबाजंूनी अधिकाधिक सुखकर बनवत गेला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण आधुनिकतेच्या उंचीवर पोहोचताना आपल्या आजूबाजूला अत्यंत जवळ असलेल्या पर्यावरणापासून तो कळत-नकळत दूर व्हायला लागला. नातं मग ते कोणतंही असो, त्यामध्ये अंतर आलं की संघर्ष अटळ आहे, असं म्हटलं जातं. वातावरणातील अयोग्य बदल, कमी होणारे पावसाचे प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेली पाण्याची कमतरता, संपुष्टात येणारी शेतजमीन आणि जंगले, या आणि अशा अनेक गोष्टी पाहिल्या की या पृथ्वीरूपी वैश्विक कुटुंबातला बंड पुकारलेला माणूस नावाचा घटक आणि निसर्ग यांच्यामधला एक प्रकारचा मोठा संघर्षच आहे, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये. 

प्रत्येक जण निसर्गावर भरभरून प्रेम करणारा आहे, आपल्या कृतीतून त्याची सेवा करणारा आहे, त्यामुळे प्रत्येक जण ‘पर्यावरणप्रेमी’ आहे, हे पुन्हा-पुन्हा नमूद करण्यासारखं आणि सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. प्रश्न आहे तो आपल्या दृष्टिकोनाचा, आपल्या कृतिशीलतेचा आणि आपल्या इतर अनेक विषयांच्या भाऊगर्दीतून या महत्त्वाच्या विषयाकडे डोळसपणे पाहण्याचा! आपलं जीवन जगत असताना इतरांसाठी काहीतरी विधायक करण्याची इच्छा आणि त्याची स्वत:ला झेपेल इतकी प्रामाणिपणानं केलेली अंमलबजावणी ही गोष्ट मात्र आपलं ‘जगणं’ नक्कीच आणखी सुंदर करून जाणारी आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आपण सुंदर करायला लागलो, तर आपलं संपूर्ण जीवनच सुंदर होणार, हे मात्र नक्की. 

आज अनेक व्यक्ती, संस्था पर्यावरण संवर्धनावर कार्य करत आहेत. हे कार्य आणखी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. या विषयावर काम करण्यासाठी अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या संख्येमध्ये वाढ होणे, हे देखील अपेक्षित आहे. आपल्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ रुजवणं आवश्यक आहे. 

आपल्या व्यस्त दैनंदिनीतून थोडासा वेळ काढून पर्यावरणात रमण्याचा अनुभव आपल्याला घेता येणं शक्य आहे. ‘ते पर्यावरणप्रेमी आहेत...’ असं म्हणण्यापेक्षा ‘मी पर्यावरणप्रेमी आहे’ असं आपण म्हणूया, विषयांचा अभ्यास करूया, दिवसेंदिवस आपल्या ज्ञानात भर घालूया आणि निसर्ग संवर्धनाच्या महायज्ञामध्ये मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली, लहानांना सोबत घेऊन आपल्याही समिधा अर्पण करत राहूया आणि आपल्या भावी पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण करून त्यांना आणखी संस्कारक्षम बनवूया....! - अरविंद म्हेत्रे (लेखक निसर्ग माझा सखा परिवाराचे समन्वयक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentवातावरण