शहाणे करू सकळजन; ज्ञानमंदिराला दोन लाखांची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:38+5:302021-03-26T04:21:38+5:30

करमाळा : नगरपरिषदेच्या श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिर मुक्तद्वार वाचनालयास दोन लाखांची पुस्तके भेट स्वरूपात प्राप्त झाली. युवा पिढीतील लोप पावत ...

Everyone can do it wisely; Two lakh books to Gyanmandira | शहाणे करू सकळजन; ज्ञानमंदिराला दोन लाखांची पुस्तके

शहाणे करू सकळजन; ज्ञानमंदिराला दोन लाखांची पुस्तके

Next

करमाळा : नगरपरिषदेच्या श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिर मुक्तद्वार वाचनालयास दोन लाखांची पुस्तके भेट स्वरूपात प्राप्त झाली. युवा पिढीतील लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी करमाळा नगरपरिषदेच्यावतीने श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय चालविले जाते. या वाचनालयास विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या स्थानिक विकास फंडातून दोन लाख रुपयांची ९२८ पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली.

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक विजयकुमार पवार यांच्याकडून ग्रंथ भेट मुख्याधिकारी वीणा पवार यांनी स्वीकारली. ज्ञानेश्वर वाचनालय तालुक्यातील अ-वर्ग वाचनालय आहे. यावेळी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व मुख्याधिकारी वीणा पवार, सभापती सीमा कुंभार व सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

२५करमाळा-वाचनालय

ज्ञानेश्वर वाचनालयास मिळालेल्या पुस्तकासह मुख्याधिकारी वीणा पवार व कर्मचारी.

Web Title: Everyone can do it wisely; Two lakh books to Gyanmandira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.