शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

अखेर भाजप-शिवसेना समन्वयसमितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 1:05 PM

नगरसेवकांची नाराजी : महायुतीतील घटक पक्षांना डावलून होतोय प्रचार

ठळक मुद्दे सोलापूर लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या नियोजनासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी समन्वय समितीची स्थापना केलीभाजपचे नेते शिवसेना, रासप, रिपाइं या घटक पक्षांना वगळून विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. त्याबद्दल नाराजी वाढत असून, या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या नियोजनासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी समन्वय समितीची स्थापना केली आहे. पण या समितीच्या बैठकीला शनिवारी मुहूर्त मिळाला आहे. भाजपचे नेते शिवसेना, रासप, रिपाइं या घटक पक्षांना वगळून विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. त्याबद्दल नाराजी वाढत असून, या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

महायुतीचा मेळावा नुकताच हेरीटेज गार्डनमध्ये झाला. या मेळाव्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, पुरुषोत्तम बरडे, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांचा समावेश आहे.

या समन्वय समितीने एकत्र बैठक घेऊन महायुतीच्या प्रचार सभांचे नियोजन करावे, घटक पक्षांना सोबत घ्यावे, असे आदेश दोेन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. पण सध्या शहर उत्तर आणि शहर मध्य या भागात होणाºया बैठकांना शिवसेनेसह एकाही घटक पक्षाला आमंत्रण देण्यात येत नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक सांगत आहेत. बुधवारी युवा सेनेची बैठक झाली. या बैठकीत काही पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी होणाºया या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे. 

- भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीमध्ये एकाही महिला पदाधिकाºयाचा समावेश नाही. विशेष म्हणजे महापौर आणि उपमहापौर पदावर महिला विराजमान आहेत. भाजप नेत्यांनी या दोघींना समन्वय समितीत स्थान दिलेले नाही. शिवसेनेच्या नेत्यांनीही महिला आघाडीतील पदाधिकाºयांना दूर ठेवले आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. एकदा लढतीचे चित्र स्पष्ट झाले की प्रचाराला वेग येईल. त्यामुळेच आम्ही बैठक घेतली नव्हती. पण शनिवारी होणाºया बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून कामांचे नियोजन होईल. कार्यकर्त्यांमध्येही समन्वय ठेवला जाईल. - महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक