शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अमावस्या संपली तरी म्हेत्रे यांच्यापाठीमागील विघ्न हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:41 IST

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम

ठळक मुद्देभाजपमध्ये प्रवेश मिळेल या अपेक्षेने आ. म्हेत्रे वाट पाहत आहेतम्हेत्रेंना प्रवेश न मिळाल्यास ते काँग्रेसमधून लढतील अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाला आ. म्हेत्रे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यास माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे नाव पुढे येत आहे

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभेसाठी मागील दोन महिन्यांपासून आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशाचे काही कळेनासे झाले आहे. म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाची आशा अजूनही संपलेली नाही. रोज येणाºया वेगवेगळ्या बातम्यांमुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून मागील दोन महिन्यांपासून आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत.  या सगळ्या बाबींवरून म्हेत्रे यांचा पक्ष प्रवेश, उमेदवारी सहज मिळेल असे सर्वांना वाटत होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सोमवारी प्रवेश निश्चित होणार अशी बातमी सोशल मीडियाच्या सर्व ग्रुपवर फिरत होती. यामुळे म्हेत्रे समर्थक संभ्रमात आहेत. सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम आहे.

रविवारी दुपारपासून सोमवारपर्यंत म्हेत्रे यांचा भाजप प्रवेश होणार आहे अशी चर्चा होती. म्हेत्रे मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत होते. या सगळ्या घडामोडीत आ. म्हेत्रे यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्वत: कबूल केले. हे नेमकं चाललंय काय? या बाबत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्या आधारे सोमवारी दुपारी आ. म्हेत्रे हे सोलापूर येथे विविध नेत्यांबरोबर चर्चा करीत होते.

भाजपमध्ये प्रवेश मिळेल या अपेक्षेने आ. म्हेत्रे वाट पाहत आहेत. म्हेत्रेंना प्रवेश न मिळाल्यास ते काँग्रेसमधून लढतील अशी अपेक्षा पक्षाला आहे. आ. म्हेत्रे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यास माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनीही नकार दिल्यास मूळचे दुधनीचे व कलबुर्गी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर संतोष पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकakkalkot-acअक्कलकोटcongressकाँग्रेसBJPभाजपा