शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

धीरजला प्रसंगानुसार विज्ञान आठवले; अन् त्याने जयश्रीकाकूंना विजेच्या धक्क्यातून वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:51 IST

सोलापूर शहरात असलेल्या वारद चाळीतील घटना;  त्या मुलाच्या युक्तीचे सर्वत्र कौतुके

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

यशवंत सादूल 

सोलापूर : सकाळच्या सातची वेऴ़़ पाण्याचा दिवस... वारद चाळीत पाणी भरण्यासाठी एकच लगबग... जयश्री अनिल मेडीदार या ४२ वर्षांच्या गृहिणी घरासमोरील पिण्याच्या पाण्याच्या नळातून विद्युत मोटारीच्या साहाय्याने पाणी भरण्याचा प्रयत्न करत होत्या... त्यासाठी वायरची जोडणी करताना विजेचा धक्का (शॉक) लागल्याने जयश्री या बेशुद्ध होऊन खाली पडल्या़ अंगात विद्युतसंचार चालूच होता़ हा प्रसंग समोरच खेळणाºया सिद्धेश्वर प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या धीरज घोंगडे याने हा बाका प्रसंग पाहिला़ पाहताच नववी शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक आणि रोधक वस्तूची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर करून चपखलपणे विद्युतप्रवाह खंडित केला अन् जयश्रीकाकूंचा जीव वाचविला.

 भैय्या चौक ते नवीवेस रस्त्यावरील नरसिंग गिरजी मिलसमोरील वारद चाळ (त्रिकोण चाळ) येथे ३५ ते ४० कुटुंबे राहत आहेत. या चाळीत जयश्री मेडीदार या मागील पंचवीस वर्षांपासून येथे राहतात. त्यांच्या पतीचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी सात वाजता पाणी आल्याने त्या पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत असताना अचानक हातातील प्लगमधून बाहेर पडलेल्या वायरातील तारांशी स्पर्श होऊन त्यांना विद्युत धक्का बसला़ काही कळायच्या आत त्या जोराचा आवाज करून जागेवरच कोसळल्या. पायात चपला नाहीत, ओलसर हात आणि कपडे यामुळे धक्का लागला होता. समोरच मोकळ्या जागेत खेळणाºया दहावीत शिकत असलेल्या धीरज महेश धोंगडे याने हा प्रसंग पाहून घाबरून न जाता जवळच अडगळीत पडलेले लाकूड ओढून काढले. धैर्याने जयश्री आणि विद्युतप्रवाह चालू असलेल्या वायर यांच्यामध्ये धरून प्रवाह खंडित केला.

काकू बेशुद्ध पडल्याचे सर्वांना ओरडून सांगितले. सर्व चाळकरी गोळा झाले आणि शांताबाई जमखंडी, सुजाता उमराणी, महानंदा मसळी, मीनाक्षी बिराजदार आदी महिलांनी त्यांचे हातपाय चोळून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केला़ त्यांच्या डाव्या हातावर वायर धरलेल्या ठिकाणी जळून खोलवर जखम झाल्याचे आढळून आले. शुद्धीवर आल्यावर जवळील डॉक्टरांना दाखविण्यात आले. तपासणीनंतर जुजबी उपचार करून औषधे दिली. धोका टळल्याचे सांगून विश्रांतीचा सल्ला दिला. सिद्धेश्वर तरुण मंडळ व नगरसेवक चेतन नरोटे, कलप्पा मेडीदार, लिंगप्पा मसळी, सिद्धू बिराजदार, प्रभाकर जक्का आदींनी धीरजच्या धाडसाचे कौतुक करून सत्कार केला़ यावेळी चाळीतील लोक उपस्थित होते़

शहरात सर्रास विद्युत मोटारीने पाणी उपसा...- शहरात सर्वत्र चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. काही भागात पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने, आठ दिवस पुरेल इतके पाणी भरून ठेवण्यासाठी विद्युतपंपाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते़ पाणी भरताना अंग, कपडे ओले होतात़ पायात चप्पल नसल्याने विजेच्या धक्क्याने दगावणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

सिद्धेश्वर प्रशालेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या धीरजला समोरील बाका प्रसंग पाहताच नववी इयत्तेत शिकत असताना विज्ञान विषयातील विद्युतवाहक व विद्युतरोधक वस्तूंची आठवण झाली आणि जवळच अडगळीत पडलेल्या लाकडाचा वापर केला आणि विद्युतप्रवाह खंडित करीत त्याने जीव वाचविला़ - धीरज घोंगडे,विद्यार्थी, सिद्धेश्वर प्रशाला

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरणHealthआरोग्यEducationशिक्षणSchoolशाळाscienceविज्ञान