शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५९ कृषीपंपांच्या वीजजोडणीचे काम पूर्ण

By appasaheb.patil | Published: August 31, 2019 12:46 PM

महावितरण : ११ हजार ७८७ कृषीपंपांना मिळणार उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे वीजजोडणी; ‘एचव्हीडीएस’च्या कामांना वेग 

ठळक मुद्देएचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईलकृषीपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहेउच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे

सोलापूर :  बारामती परिमंडल अंतर्गत पेडपेंडींग असणाºया ११ हजार ८७८ कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १ हजार २५९ कृषीपंपांसाठी वीजजोडणी देण्याच्या वीजयंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी ६६१ कृषीपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. 

दरम्यान, ‘एचव्हीडीएस’च्या कामांना मोठा वेग देण्यात आला असून येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत या योजनेतील सर्वच कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

बारामती परिमंडल अंतर्गत मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाºया सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, बार्शी, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा आदी तालुक्यातील ११ हजार ८७८ कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येत आहे़ या वीज जोडण्यासाठी बारामती परिमंडलातील १९७ निविदांद्वारे कंत्राटदारांना विविध कामांचे आदेश देण्यात आले आहेत़ या सर्व वीजजोडण्यांच्या कामांसाठी ५२२ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

या नव्या वीजजोडण्या उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल. 

रोहित्र बिघडणे होणार बंद...प्रचलित पद्धतीनुसार कृषीपंपांना ६३ केव्हीए /१०० केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास १५ ते २० कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. 

एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषीपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण सुद्धा अतिशय नगण्य राहणार आहे.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन