जुना बोराणमी नाका येथे इलेक्ट्रिक डीपीने घेतला पेट, महावितरणच्या लाखो रूपयांचे नुकसान

By Appasaheb.patil | Updated: March 15, 2023 16:40 IST2023-03-15T16:39:55+5:302023-03-15T16:40:29+5:30

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महावितरणचा डीपी (रोहित्रे) आहे. या रोहित्राला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली.

Electric DP caught fire at Juna Boranmi Naka, loss of lakhs of rupees to Mahavitaran | जुना बोराणमी नाका येथे इलेक्ट्रिक डीपीने घेतला पेट, महावितरणच्या लाखो रूपयांचे नुकसान

जुना बोराणमी नाका येथे इलेक्ट्रिक डीपीने घेतला पेट, महावितरणच्या लाखो रूपयांचे नुकसान

सोलापूर : जुना बोरामणी नाका परिसरातील मार्केट यार्डच्या गेटसमोरील महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरातील कचरा मोठ्या प्रमाणात पेटला. लागलीच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महावितरणचा डीपी (रोहित्रे) आहे. या रोहित्राला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे लोळ आकाशात मोठया प्रमाणात पसरल्याने परिसरात बघ्याची गर्दी मोठी झाली होती. या परिसरातील नागरिक, दुकानदारांनी आग विझविण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळावर दाखल झाले होते. या घटनेमुळे काही काळ या भागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला हाेता.
 

Web Title: Electric DP caught fire at Juna Boranmi Naka, loss of lakhs of rupees to Mahavitaran