शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निंबाळकरांसह आठ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:48 AM

आतापर्यंत या मतदारसंघात एकूण १५  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

ठळक मुद्देसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज घेतला ४ एप्रिल माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवसबुधवार ३ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासह अन्य उर्वरित पक्षातील उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता

सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आठ उमेदवारांनी एकूण अकरा अर्ज दाखल केले. निंबाळकर यांनी यावेळी तीन अर्ज दाखल केले तर हिंदुस्थान प्रजा पक्ष व बहुजन महापार्टीच्या उमेदवारांनीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंद यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेनेचे आ. नारायण पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रा. शिवाजी सावंत आदींच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील नवनाथ पाटील यांनी यावेळी हिंदुस्थान प्रजा पक्षाकडून तर कुर्डूवाडीचे शहाजहान शेख यांनी बहुजन महापार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी माळशिरस तालुक्यातील फडतरी येथील बाबुराव रुपनवर, पुण्यातील चिंचवड येथील रामदास माने, मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील सिद्धेश्वर आवारे, माण तालुक्यातील अजिनाथ केवटे,संदीप खरात या उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

४ एप्रिल माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. बुधवार ३ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासह अन्य उर्वरित पक्षातील उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मतदारसंघात एकूण १५  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

सुभाष देशमुखांसह १२ जणांनी घेतला अर्ज - भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांचा अर्ज दाखल केल्यानंतरही पूरक अर्ज भरणार आहे असे सांगून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावेळी अन्य ११ जणांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यात सोलापूरचे हिंदुस्थान जनता पार्टीचे इरफान पटेल, करमाळ्याचे उमेदवार अशोक वाघमोडे, फलटणचे राजेंद्र भोसले, सोलापूरचे संदीप बेंद्रे, पंढरपूरचे हनुमंत देव, सांगोल्याचे दत्तात्रय खटके, सोलापूरचे रोहन मोरे, फलटणचे शिवाजी अभंग, अक्कलकोटचे मंजूनाथ सुतार व पंढरपूरचे अब्दुल मुलाणी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNarayan Patilनारायण पाटील