शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानात वाढीसाठी प्रयत्न होणार

By admin | Updated: November 18, 2014 14:49 IST

विशेष घटक योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यावर जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती, अध्यक्षा तसेच सीईओंची चर्चा झाली.

 सोलापूर : विशेष घटक योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यावर जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती, अध्यक्षा तसेच सीईओंची चर्चा झाली. सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन कृषी, ग्रामविकास व समाजकल्याण मंत्र्यांना भेटणार असल्याचे सभापतींनी सांगितले.'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती पंडित वाघ यांनी अध्यक्षा जयमाला गायकवाड व सीईओ सुरेश काकाणी यांच्याशी चर्चा केली. अनुसूचित जातीच्या शेतकर्‍यांसाठी विशेष घटक योजनेतून विहीर व औजारासाठी अनुदान दिले जाते. विहिरीसाठी एक लाख तर औजारासाठी दिले जाणारे ५0 हजार इतके अनुदान तुटपुंजे असल्याचे वृत्त 'लोकमत' ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. कृषी समितीचे सभापती वाघ यांनी विहिरीसाठी तीन लाख तर औजारासाठी एक लाख इतके अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी यासाठी सीईओंनी थेट सचिवांशी चर्चा करावी असा मुद्दा मांडला. येत्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव घेऊन त्याचा पाठपुरावा संबंधित मंत्र्याकडे स्वत: सभापती म्हणून मी करतो असे वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

प्रभाव लोकमतचा

अधिकार द्यावेत..  ■ ठिबक सिंचनच्या प्रस्तावावर कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशा सहा सह्या शिवाय तीन कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तपासण्या असतात. ही लांबलचक असलेली पद्धत कमी करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेप्रमाणे वर्ग-३, वर्ग-४ दर्जाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार जिल्हास्तरावर असणेही गरजेचे आहे. शेततळ्यांचा समावेश करा ■ मागासवर्गीय शेतकर्‍यांना विहीर व औजारासाठीच्या अनुदानात वाढ तर केलीच पाहिजे याशिवाय शेततळ्याचाही समावेश करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे सभापती पंडित वाघ यांनी सांगितले. मागासवर्गीय शेतकर्‍यांकडे गुंतविण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे विहीर, औजारे व शेततळ्याच्या अनुदानात वाढ करण्याची गरज असल्याचे वाघ यांनी सांगितले.