खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:35 PM2020-10-07T14:35:04+5:302020-10-07T14:37:51+5:30

सोलापुरातील भैय्या चौकात तारेवरची कसरत; सहा महिन्यांपासूनची स्थिती, मनपा अधिकाºयांचे दुर्लक्ष

Dug a pit ... not dug; The continuous rain also uprooted the road! | खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला !

खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला !

Next
ठळक मुद्देभैय्या चौक परिसरात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी मंगळवारी लोकमतच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाया रस्त्याच्या दुरवस्थेकडे कुणाचेही लक्ष नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लोक दुचाकीवरून खाली पडलेकाही लोक गंभीर जखमी झाले. सायंकाळी रस्त्यावर प्रचंड धूळ असते

सोलापूर : व्हीआयपी रोडवरील खडीवर घसरुन सोमवारी एका तरुणाचा हात मोडला. वारद चाळीसमोर सहा महिन्यांपूर्वी खोदलेला खड्डा बुजविण्यास मक्तेदाराला आणि महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील अधिकाºयांना वेळ मिळालेला नाही. हा खड्डाही अपघाताला आमंत्रण देत आहे.  

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील प्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या कामाचे तीन -तेरा झाले आहेत. ड्रेनेजचे काम करणारे मक्तेदार रस्ते उखडून काम अर्धवट ठेवत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) परिसरात स्मार्ट सिटीच्या एल. सी. इन्फ्रा मक्तेदाराने ड्रेनेज लाईनसाठी खोदाई केली. वारद चाळीसमोर अजय राऊत या मक्तेदाराने खोदाई केली.

स्मार्ट सिटीच्या मक्तेदाराने काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित केला नाही. त्यामुळे चौकात अपघात होत आहेत. वारद चाळीसमोर राऊत यांनी मोठा खड्डा खोदून ठेवला. रस्ता खराब आहे. मुरुम सर्वत्र पसरला आहे. छोटा खड्डा चुकविण्याच्या नादात एखादा वाहनचालक या मोठ्या खड्ड्यामध्ये पडू शकतो, असे पोलीस कर्मचाºयांना वाटते. ड्रेनेज विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाºयांना ही गोष्ट लक्षात कशी येत नाही, याबद्दल पोलिसांनाही आश्चर्य वाटते. स्मार्ट सिटी आणि ड्रेनेजच्या कामावर एकच अधिकारी नियंत्रण ठेवत आहेत. परंतु, टक्केवारीच्या नादात त्यांचे मूळ कामांकडे लक्ष नाही.

पोलिसांना धाकधूक
भैय्या चौक परिसरात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी मंगळवारी लोकमतच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे कुणाचेही लक्ष नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लोक दुचाकीवरून खाली पडले. काही लोक गंभीर जखमी झाले. सायंकाळी रस्त्यावर प्रचंड धूळ असते. सहा-सहा महिने झाले तरी कोणीही दुरुस्ती करायला फिरकले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Dug a pit ... not dug; The continuous rain also uprooted the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.