शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या चटक्यानं लिंबू पेट्रोलपेक्षा अधिक खातोय 'भाव', पालेभाज्या ५ ते १० रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 17:42 IST

बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवार, भेंडी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवार, भेंडी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यात मेथीसह पालक, कोथिंबिरीचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले. पाच ते दहा रुपयांच्या दरात त्याची विक्री सुरू आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी दहा रुपयांत दहा ते पंधरा नग मिळणाऱ्या लिंबांना आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. शहरातील बाजारपेठेत वीस रुपयांना तीन याप्रमाणे विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयाला दोन लिंबू मिळत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लिंबाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह भाजीपाल्यावर झाल्यानंतर गेले कही दिवस दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली होती. परिणामी दरात मोठी वाढ झाली होती, परंतु गेल्या आठ दिवसांपासून टप्प्याटप्प्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरातही मोठी घसरण पाहण्यास मिळत आहेत. लिंबांच्या मागणीत वाढशहर व परिसरात उन्हाचा चटका वाढल्याने रसवंती, लिंबू सरबत, लिंबू शिखंजी, सोडा यासह विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. परिणामी लिंबाची मागणी वाढल्याने पंधरा दिवसांपासून भाव तेजीत आले आहेत. सध्या लिंबाचे दर १२० ते १५० आहेत. मे महिन्यात लिंबाचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. भाजीपाल्याचे दर

  • लिंबू १२० ते १५०रूपये
  • भेंडी : ६० रूपये
  • गवार १०० रूपये
  • वांगे : ३० रूपये
  • मेथी: ५ ते १० रुपये
  • पालक : ५ ते १० रुपये
  • कोथिंबीर : ५ ते १० रुपये
  • शेपू :५ ते १० रुपये

 

टॅग्स :SolapurसोलापूरInflationमहागाई