शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
2
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
3
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
4
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
5
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
6
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
7
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
8
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
9
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
10
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
11
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
12
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
13
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
14
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
16
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
17
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
18
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
19
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
20
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा

By appasaheb.patil | Updated: April 10, 2019 14:09 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सोलापूर : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाºया दक्षिण तालुक्याला यंदाही ग्रहण लागले आहे़ पुरेशा पाण्याअभावी जळून चाललेल्या फळबागांना शेतकºयांकडून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची भीषण वास्तवता बंकलगी (ता़ दक्षिण सोलापूर) परिसरात दिसून येत आहे़.

दक्षिण तालुक्यातील बंकलगी येथे आंबा, द्राक्ष, लिंबू, बोर, पेरू यासह वेगवेगळ्या फळबागांची अंदाजे शंभर एकर लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक फळबागा लागवड ही द्राक्ष व लिंबूची आहे.

सोलापूर जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, शिवाय पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामही हातचा गेला. फळबागांवरही पाणीटंचाईचे संकट आहे. एकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे अन्नपाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत आहेत.

एनटीपीसी परिसरातून मिळतेय पाणी- एनटीपीसी या वीजनिर्मिती करणाºया कंपनी परिसरात तीन मोठमोठे स्टोअरेज टँक उभे करण्यात आले आहेत. त्याधील लाखो लिटर पाणी दररोज जमिनीत मुरते़ याचा फायदा परिसरातील शेतकºयांच्या विहिरींना होऊन विहिरीचा पाणीसाठा वाढला आहे़ हे पाणी संबंधित शेतकरी अंदाजे पाच हजार लिटरची गाडी पाचशे रुपयासविकत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़ 

आमच्या शेतात ३०० हून अधिक लिंबाची झाडे आहेत़ गेल्या सहा महिन्यांपासून शेतात पाणी नसल्याने बाग वाचविण्यासाठी एनटीपीसी परिसरातून विकतचे पाणी आणावे लागत आहे़ - राजकुमार दशवंत, बंकलगी

गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही एनटीपीसी परिसरातून बारा हजार लिटरसाठी पंधराशे रुपये देऊन पाणी मागवित आहोत़ फळबागा जोपासताना शेतीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़  - नागप्पा कोणदे, शेतकरी

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीwater shortageपाणीटंचाई