दारूच्या नशेत ड्रायव्हरने अंगावर घातला ट्रक, महिलेचा जागीच मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: February 15, 2023 15:06 IST2023-02-15T15:04:53+5:302023-02-15T15:06:17+5:30
ट्रकचालक पळून जात असताना तेथील रेल्वे कर्मचारी व अन्य लोकांनी ड्रायव्हरला पकडून औज ग्रामस्थांच्या स्वाधीन केले.

दारूच्या नशेत ड्रायव्हरने अंगावर घातला ट्रक, महिलेचा जागीच मृत्यू
सोलापूर : दारूच्या नशेत ड्रायव्हरने महिलेच्या अंगावर ट्रक घातल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औज (ता. द. सोलापूर) येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. रंगूबाई अरुण डोंबाळे (वय ४२, रा. औज, ता. द. सोलापूर) असे मृत्यू महिलेचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेली माहितीनुसार, बुधवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता औज झुयारी सिमेंट कंपनी जवळ औज गावातील एक महिला रस्त्याच्याकडेला जात असताना सिमेंटचा बलकर ट्रक या महिलेला धडकला. ट्रकचालक पळून जात असताना तेथील रेल्वे कर्मचारी व अन्य लोकांनी ड्रायव्हरला पकडून औज ग्रामस्थांच्या स्वाधीन केले.
संबंधित ड्रायव्हर दारूच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास वळसंग पोलिस करीत आहेत.