शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 3:28 PM

मंजूर केंद्रांवर धान्य खरेदी होईना; पाच केंद्र मंजुरीचे प्रस्ताव अधांतरीच

ठळक मुद्देकाही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाहीदोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही

सोलापूर : पाऊस नसल्याचे परिणाम खोलवर गेल्याचे जाणवू लागले आहे. उडीद, मूग व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात तब्बल ७ हमीभाव केंदे्र प्रस्तावित असली तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट व उत्तर तालुक्याच्या केंद्रांवर धान्याची खरेदी सुरू झाली नाही. अन्य पाच केंद्रे मंजुरीसाठी संस्थांचे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मंजुरीविना अधांतरीच अडकले आहेत. धान्याची आॅनलाईन नोंदीसाठी अवघे ५ दिवस शिल्लक असताना हमीभाव केंद्रावर धान्याचा दुष्काळ दिसत आहे.

 शेतीमालाची आवक झाली की बाजारात दराची घसरण सुरू होते. हे नित्याचेच आहे. शेतीमालाची ºहास एकाचवेळी सुरू होते व  पैशाची गरज असल्याने शेतकरी धान्य बाजारात विक्रीला आणतात. खरीप हंगामातील धान्य बाजारात येण्याच्या सुरुवातीला उडीद, मूग, मका, सोयाबीन आदींना बºयापैकी दर असतो. नंतर मात्र दराची घसरण होते. दर परवडणारा नसला तरी बºयापैकी दर मिळत असल्याने शेतकरी धान्य विक्रीला आणतात, शेतकºयांकडून धान्याचा ओघ सुरू झाली की दराची घसरण सुरू होते. हे टाळण्यासाठी शासनाकडून हमीभाव केंद्रे सुरू केली जातात.

शेतकºयांनी उडीद, मूग, मका,  सोयाबीन व अन्य धान्याची हमीभाव केंद्रासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या धान्याचीच हमीभाव केंद्रावर खरेदी केली जाते. यावर्षी उडीद, मूग या धान्याची आॅनलाईन नोंदणीची मुदत २५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर तर सोयाबीनची  ३१ आॅक्टोबरपर्यंत शासनाने दिली आहे.

या मुदतीत फक्त लिंबीचिंचोली(सोलापूर) केंद्रात उडीदसाठी ५८ तर मूगसाठी २१, सोयाबीन २ व अक्कलकोट या केंद्रावर उडीद १११ व मुगासाठी २१ अशा दोन केंद्रावर २१३ शेतकºयांनी नोंद केली आहे. प्रत्यक्षात धान्य खरेदीला सुरुवात झाली नाही.  करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी व माळकवठे(दक्षिण सोलापूर) या ठिकाणी हमीभाव केंद्र खरेदीसाठी संस्था मंजुरीच शासनाने अद्याप केली नसल्याचे सांगण्यात आले. खरीप शेतीमाल नसल्याचीही हमीभाव केंद्र मंजुरीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाही तर दोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका व अन्य खरीप पिके वाया गेली आहेत. काही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू आहे. 

खरीप हंगाम संपला..- सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सोलापूर बाजार समिती (उत्तर सोलापूर) व माळकवठे(दक्षिण सोलापूर) येथे हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित होते. - अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके असतात त्यामुळे अक्कलकोट व दुधनी या ठिकाणी हमीभाव केंदे्र सुरू केली जातात; मात्र यावर्षी दुष्काळामुळे खरीप हंगाम संपला तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट केंद्रावरही धान्याची खरेदी सुरू नाही.- मूग प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, मका १७०० रुपये क्विंटल तर सोयाबीनची खरेदी ३३९९ रुपयाने केली जाणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार