राष्ट्रवादीचा नाद करू नका - मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:57 IST2018-04-07T03:57:48+5:302018-04-07T03:57:48+5:30

देवेंद्र फडवणीस तुम्ही मुख्यमंत्री असाल पण शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची पात्रता नाही. तुम्ही राष्ट्रवादीचा नाद करू नका, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

 Do not listen to NCP - Munde | राष्ट्रवादीचा नाद करू नका - मुंडे

राष्ट्रवादीचा नाद करू नका - मुंडे

सोलापूर - देवेंद्र फडवणीस तुम्ही मुख्यमंत्री असाल पण शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची पात्रता नाही. तुम्ही राष्ट्रवादीचा नाद करू नका, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सोलापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते़ सोलापूर जिल्ह्यात महूद, मोहोळ आणि सोलापूर येथे शुक्रवारी हल्लाबोल आंदोलनाच्या सभा झाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,खा. विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री आज मुंबईत बोलताना शरद पवार औषधाला उरणार नाहीत, असे बोलले. फडणवीसांचे गुरू दिल्लीत बसले आहेत. तुमचा गुरू पवार साहेबांचे बोट धरुन राजकारणात आल्याचे कबूल करतो. त्याचे तरी ऐका. पहिल्या अधिवेशनानंतरच तुमचे सरकार पडले असते. मंत्र्यांचा घोटाळा आला की, पुरावे दिले की मुख्यमंत्र्यांची क्लीन चीटची पावती तयार असते.
निर्ढावलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी या भागातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले़

Web Title:  Do not listen to NCP - Munde