शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. ला महिन्यात तीन सीईओ

By admin | Updated: June 26, 2014 01:25 IST

आर. पी. झेंडे: गुडेवार यांच्या बदलीमुळे पुणे जि. प. च्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार

सोलापूर: महत्त्वाची पदे रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेला जून महिन्यात तीन सीईओ पाहावयाला मिळाले असून, सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात अधिकारी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे जिल्हा परिषदेला प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या आर. पी. झेंडे यांच्याकडे आता सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा पदभार सोपविला आहे.सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या रिक्त पदांची संख्या वरचेवर वाढत आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद रिक्त झाले आहे. हणमंत मुळूक हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिकामे झाले आहे. वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही हे पद भरण्यात आले नाही. ३१ मे रोजी अतिरिक्त सीईओ तानाजी गुरव हे सेवानिवृत्त होणार असल्याचे शासनाला माहीत होते. तरीही गुरव यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती केली नाही. हे पद रिक्तच ठेवले. सीईओ श्वेता सिंघल या प्रसूती रजेवर जाणार हेही नक्की होते, असे असताना अतिरिक्त सीईओ व प्रकल्प संचालक पदे रिक्त ठेवली. त्यामुळे आता पदभार घेण्यासाठीही अधिकारी उरला नाही. १२ जूनपासून सिंघल या रजेवर गेल्याने त्यांचा तात्पुरता पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे दिला. गुडेवार यांची बदली झाल्याने आता पदभार घेण्यासाठीही अधिकारी नसल्याने थेट पुणे जि. प. च्या अधिकाऱ्याला सोलापूर जि. प. च्या सीईओचा तात्पुरता पदभार सोपविला आहे. पुणे जि. प. चे प्रकल्प संचालक आर. पी. झेंडे हे गुरुवारी सोलापूर जि. प. चे प्रभारी सीईओ म्हणून पदभार घेणार आहेत. पुणे जि. प. चे कामकाज सांभाळून सोलापूर जि. प. चे कामकाज त्यांना करावे लागणार आहे. -------------------------कोण राहिला नाही वालीपुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्हा परिषदेला सक्षम व पाहिजे ते अधिकारी नियुक्त केले जातात; मात्र सोलापूर जिल्हा परिषदेला सक्षम अधिकारी आणणारे वजनदार नेतृत्व राज्याच्या मंत्रिमंडळात नाही. अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जि. प. ची महत्त्वाची पदे रिक्त ठेवू दिली नाहीत. आता सोलापूर जि. प. ला कोणीच वाली राहिला नसल्याने महत्त्वाच्या पदावरील अधिकारी नसल्याने कारभार कसाबसा सुरू आहे.