शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. कर्मचारी बदल्यांचे आदेश मे अखेरपर्यंत होणार प्रक्रिया

By admin | Updated: May 7, 2014 00:52 IST

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्यांचे आदेश आले असून मे अखेरपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्यांचे आदेश आले असून मे अखेरपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठीचा आदेश ३ मे रोजी निघाला आहे. बदल्यांची प्रक्रिया मागील वर्षीच्या आदेशानुसारच राबवायची आहे. जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया १७ ते २३ मे तसेच तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया २६ ते ३१ मेदरम्यान राबवायची आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने बदल्यांचा आदेश काढला असला तरी सोलापूर जिल्हा परिषदेत याची कसलीच तयारी नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र शनिवारी आदेश निघाल्याने बदल्या होणार आहेत. शिक्षण खात्याच्या शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधरांच्या पदोन्नतीचा विषय अद्याप पूर्ण झालेला नाही. अशात बदलीस पात्र शिक्षकांची यादी तयार कशी होणार?, हा प्रश्न आहे. ....चर्चा झाली नावालाच...रविवार, दिनांक ४ मे रोजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, मुख्य सचिव जे. एस. सहारिया, ग्रामविकासचे प्रधान सचिव एस. एस. संधु, उपसचिव रहाटे यांनी जि. प., आरोग्य, शिक्षक व अन्य संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. एकीकडे ग्रामविकास मंत्र्यांनी संघटना पदाधिकार्‍यांशी बदल्यांच्या धोरणावर रविवारी चर्चा केली असताना दुसरीकडे शनिवारीच बदल्यांचा आदेश निघाला आहे. ....महसूलची बदल्यांची तयारी महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी बदलीस पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार केली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. शासन आदेशाप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे.