महाराष्ट्र दिनी सोलापूरचे  डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 13:10 IST2021-04-29T13:09:06+5:302021-04-29T13:10:45+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Disley Guruji of Solapur, painter Dhotre honored by Tourism Department on Maharashtra Day | महाराष्ट्र दिनी सोलापूरचे  डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव

महाराष्ट्र दिनी सोलापूरचे  डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव

सोलापूर : यंदा  शनिवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे सोलापूरचे  कीर्तिमान सुपुत्र जागतिक किर्तीचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी व जागतिक किर्तीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा गौरव होणार आहे. तसे परिपत्रक पर्यटन विभागाने गुरुवारी काढले आहे.

यासोबत सुप्रसिद्ध इलेक्ट्रिकल इंजिनियर प्रथमेश हिरवे, आयएएस अधिकारी प्रांजल पाटील, बॉक्सिंग मेडलिस्ट अल्फिया पठाण, गिर्यारोहक प्रियंका मोहिते, लघुपट निर्माते मानसी देवधर, चैतन्य ताम्हणे, क्रीडापटू कविता राऊत, सचिन टेके, सुमन धामणे आदींचाही गौरव करण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे.

Web Title: Disley Guruji of Solapur, painter Dhotre honored by Tourism Department on Maharashtra Day