शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीत चर्चा, ‘टॅबला हळदी-कुंकू लावायचं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:17 IST

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अंगणवाडीतील बालकांचे आधारकार्ड लिंकिंग करण्यासाठी टॅबचे वाटप करण्यात आले, पण गेल्या पाच ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार २१४ अंगणवाडी सेविका महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब देण्यात आलेमूळ उद्देश सफल न झाल्याने टॅबचे खेळणे झाले असल्याची प्रतिक्रिया पर्यवेक्षिकांनी व्यक्त केली

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अंगणवाडीतील बालकांचे आधारकार्ड लिंकिंग करण्यासाठी टॅबचे वाटप करण्यात आले, पण गेल्या पाच महिन्यांत सिमकार्डचे वाटप न केल्याने हे काम ठप्प झाले आहे.  वैतागून अंगणवाडी ताई म्हणाहेत, या टॅबला हळदी-कुंकू लावून ठेवावं का?

जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांचे आधार लिंकिंग करणे, आॅनलाईन हजेरी व अंगणवाडी सेविकांकडून घेतलेली माहिती भरण्यासाठी पर्यवेक्षिकांना टॅब देण्यात आले आहेत. त्यावर पर्यवेक्षिकांना टॅबवर माहिती भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टॅबवर लॉगिन कसे करायचे, बायोमेट्रिक हजेरी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. टॅबमुळे पर्यवेक्षिकांचे दररोजचे काम, अंगणवाडी भेटी व संकलित माहिती आॅनलाईन भरल्यामुळे कामाचा वेग वाढणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून सर्वच अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि एक अ‍ॅप देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना बालकांचे वजन, उंची, पूरक पोषण आहार पुरवठा, अंगणवाडीतील उपस्थिती, आजार, स्तनदा मातांसाठी पोषण आहार वाटप आदींसंदर्भात नियमित माहिती भरावी लागते. ही माहिती एका क्लिकमध्ये थेट केंद्रीय मंत्रालयापर्यंत पोहोचत असल्याने देशभरातील स्थितीबद्दल आकडेवारी उपलब्ध होते. त्यातून आरोग्यविषयक तसेच पोषणविषयक योजना राबविण्यास मदत होणार आहे. 

पुढील टप्प्यात अंगणवाडी सेविकांनाही टॅब देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे अंगणवाडी सेविका लवकरच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बालकल्याण मंत्रालयासोबत कनेक्ट होणार आहेत. सध्या महाराष्टÑात अशी यंत्रणा नसल्याने अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टरमध्ये बालकांच्या उपस्थितीसह आजार, पोषण आहार, कुपोषणाची श्रेणी आदी माहिती भरावी लागते. या अ‍ॅपवर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी भरायची असल्याने रजिस्टरमधील दैनंदिन नोंदी ठेवण्यापासून अंगणवाडी सेविकांना मुक्ती मिळणार आहे. मोबाईल अ‍ॅपची योजना राबविण्यासंदर्भात मुंबईमध्ये बैठक झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार २१४ अंगणवाडी सेविका असून, तीन हजार १५६ मदतनीस आहेत. मोठ्या अंगणवाड्या तीन हजार २६९ असून, मिनी अंगणवाड्या ९४५ आहेत.

टॅब झाले खेळणे- महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब देण्यात आले. बºयाच पर्यवेक्षिकांना टॅब वापराचे ज्ञान नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. लिंकिंग करताना काहींची नावे चुकल्याने टॅब सुरूच झाले नाहीत. नेटवर्किंग नसल्याने आॅनलाईन बायोमेट्रिक हजेरी, बालकांचे आधार लिंकिंग ही कामे झालीच नाहीत. मूळ उद्देश सफल न झाल्याने टॅबचे खेळणे झाले असल्याची प्रतिक्रिया पर्यवेक्षिकांनी व्यक्त केली आहे. 

महिला बालकल्याण विभागातर्फे  अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आधार लिंक, बायोमेट्रिक हजेरी, अंगणवाडीची माहिती भरण्यासाठी टॅब देण्यात आले आहेत. टॅब लिकिंग करण्याचे काम सुरू आहे. सिमकार्ड मिळविण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. - देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटलSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद