शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून विसर्ग वाढविला; भीमा नदीला पूर येणार, सीना नदीचे पाणी हायवेवर; सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:47 IST

दरम्यान, सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता उजनी धरणातून १ लाख ५ हजाराचा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने  उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आत दिवसभरात भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तहसिल प्रशासनाने लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

दरम्यान, सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता उजनी धरणातून १ लाख ५ हजाराचा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. सीना नदीचा पूर आल्याने सोलापूर-विजयपूर महामार्ग सकाळपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहनांसाठी महामार्ग विभागाने पर्यायी मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-कोल्हापूर महामार्ग सुरू करण्यात आला असून सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ujani Discharge Increased; Bhima River Flooding; Highway Closed.

Web Summary : Increased Ujani dam discharge raises flood risk for Bhima River. Sina River floods close Solapur-Vijaypur highway. Solapur-Pune and Solapur-Kolhapur highways are open, while Solapur-Tuljapur traffic is slow. Residents are advised to evacuate low-lying areas.
टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीfloodपूर