पिण्यासाठी अन् शेतीसाठी उजनीतून भीमानदीत १८०० क्यूसेकनी विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:19 IST2021-05-20T15:14:27+5:302021-05-20T15:19:56+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

पिण्यासाठी अन् शेतीसाठी उजनीतून भीमानदीत १८०० क्यूसेकनी विसर्ग सुरू
भीमानगर - सोलापूर शहर आणि नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी गुरुवारी २० मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजता भीमा नदी पात्रात १८०० क्यूसेकनी पाणी सोडण्यात आले.
उजनी धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात अठराशे क्युसेक क्षमतेने विसर्ग सोेडण्यात आला आहे. तर मुख्य कालव्यांमधून एकतीस ते पन्नास क्यूसेकनी तर बोगदा ५६० क्यूसेक दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सध्या कमी म्हणजेच मायनस झालेला आहे. उजनीची सद्यस्थिती उणे ५ टक्के आहे.