दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’

By Appasaheb.patil | Updated: August 28, 2019 15:15 IST2019-08-28T15:12:17+5:302019-08-28T15:15:53+5:30

काँग्रेसला धक्का; हजारो समर्थकांनी केला दिला जय महाराष्ट्राचा नारा

Dilip Mane enters Shiv Sena; Shivbandhan built on Matoshree | दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’

दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’

ठळक मुद्दे- दिलीप माने हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत- दिलीप माने याच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार- आगामी विधानसभा निवडणूकीत दिलीप माने यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याकडे लागले साºयाचे लक्ष

सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला़ यावेळी उध्दव ठाकरे यांनी दिलीप माने यांना शिवबंधन बांधून हातात भगवा झेंडा देऊन शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासमवेत सुपुत्र पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, जयकुमार माने यांनीही शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला़ यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.



 

Web Title: Dilip Mane enters Shiv Sena; Shivbandhan built on Matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.