भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच...

By appasaheb.patil | Published: March 6, 2019 03:23 PM2019-03-06T15:23:10+5:302019-03-06T15:25:30+5:30

आप्पासाहेब पाटील  सोलापूर : उन्हाच्या असह्य होणाºया झळांमुळे शहरातील विविध भागात झाडाखाली किंवा रस्त्यांच्या कडेला पाल मांडत रचलेले कलिंगडाचे ...

Demand for the state of Kalinga, from Bhima-Seena Kho; The rate is constant ... | भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच...

भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच...

Next
ठळक मुद्देकलिंगडाची आवक वाढल्याने दरही स्वस्त शुगर किंग, मधु, चट्टापट्टा, नामधारी या कलिंगडांचे आकर्षणलालचुटूक गारेगार कलिंगड खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : उन्हाच्या असह्य होणाºया झळांमुळे शहरातील विविध भागात झाडाखाली किंवा रस्त्यांच्या कडेला पाल मांडत रचलेले कलिंगडाचे ढीग पाहायला मिळत आहेत. कलिंगडाची आवक वाढल्याने दरही स्वस्त झाले आहेत. ५० रुपयांत दोन कलिंगड मिळू लागले आहेत़ दरम्यान, बाजारात असलेले शुगर किंग, मधु, चट्टापट्टा, नामधारी या कलिंगडांचे आकर्षण वाढले असून, आतून लालचुटूक गारेगार कलिंगड खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. 

सध्या सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट, आसरा चौक, रेल्वे मार्केट मंडई, जुळे सोलापूर भाजी मंडई, कस्तुरबाई मार्केट, कुंभार वेस, विजापूर रोड, कंबर तलाव आदी भागात कलिंगड विक्रीची दुकाने थाटलेली दिसत आहेत़ दरम्यान, सोलापुरात शुगर किंग, मधू, चट्टापट्टा, शुगर बी, नामधारी या पाच जातींचे कलिंगड विक्रीला आले आहेत.

शहरातील बाजारात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, फलटण, कळंब, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून कलिंगड दाखल झाले आहेत़ आवक वाढल्याने कलिंगडांचे दर स्थिर  आहेत. साधारणपणे ५० रुपयाला दोन कलिंगड मिळत आहेत़ यंदा सोलापुरातील बाजारात फलटण, कळंब, बार्शी, दक्षिण सोलापूर, उस्मानाबाद, उत्तर सोलापूर, पंढरपूर आदी ठिकाणांहून माल विक्रीसाठी येत आहे़ सध्या मालाची आवक कमी आहे, मात्र पुढील आठवड्यात आवक वाढेल़ कलिंगडाला २० ते ६० रुपयांचा दर मिळत आहे़ शहरातील ग्राहक शुगर किंग या कलिंगडाची मागणी जास्त करत आहेत.

आवक वाढल्यास भावात घसरण होईल अशी माहिती आसरा चौकातील फ्रुट व्यापारी जैद बागवान ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ 

चिक्केहळ्ळी गाव कलिंगड लागवडीसाठी फेमस
- अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी गावाची लोकसंख्या साधारण ३ ते ४ हजार एवढी आहे़ या गावातील शेकडो शेतकºयांनी १५ ते २० एकरावर कलिंगडाची लागवड केली आहे़ याबाबत माहिती देताना शेतकरी मल्लिकार्जुन अल्लापुरे यांनी सांगितले की, योग्य नियोजन व कमी पाण्याचा वापर केल्यास कलिंगडाचे वर्षाला तीनवेळा उत्पन्न शेतकºयांना मिळते़ साधारणपणे कलिंगड हे ४५ दिवसांचे पीक आहे़ ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर केल्याने उत्पन्न वाढते़  चिक्केहळ्ळीमधील शेतकºयांचा माल हैदराबाद, इंदोर, राजस्थान, मुंबई, दिल्ली या भागात जातो़ महत्त्वाच्या शहरातील बाजारात कलिंगडाला जास्तीची मागणी आहे. शिवाय भावही चांगला मिळतो, त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होते.

जीवनसत्त्वांनी परिपूर्ण, आरोग्याला लाभदायक...
- महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. हे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एकप्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क ही जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. त्यामुळे कलिंगड हे आरोग्याला लाभदायक आहे़

उन्हाळा सुरू झाला आहे़ उन्हाळ्यात कलिंगडाला मागणी जास्त असते. त्यामुळे आम्ही तीन एकरावर कलिंगडाची लागवड केली आहे़ मागील काही दिवसांपासून कलिंगडे बाजारात पाठविण्याचे काम सुरू आहे़ आमच्या शेतातील कलिंगडे ही प्रामुख्याने इंदोर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, राजस्थानमधील बाजारात जात आहेत.कमी पाणी, योग्य नियोजन व वर्षातून तीनवेळा शेतकºयांना उत्पन्न मिळवून देणाºया कलिंगडाची लागवड शेतकºयांसाठी फायदेशीर ठरते़
- मल्लिकार्जुन अल्लापुरे, शेतकरी, चिक्केहळ्ळी

Web Title: Demand for the state of Kalinga, from Bhima-Seena Kho; The rate is constant ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.