शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देशभरातील हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी अन् बेडशीटला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:44 PM

कारखाने बंद असल्याने पुरवठा होईना; ‘स्टे इन’ची अट रद्द करण्याची कारखानदारांची मागणी

ठळक मुद्देदेशभरातील मोठे हॉस्पिटल सध्या सुरू आहेत. अशा हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मागणी येत आहेकाही कारखानदारांनी कामगारांना कारखान्यात ठेवून घेण्याची तयारी दर्शवली, पण यास कामगारांनी नकार दिलाकारखान्यात थांबण्याची कामगारांची मानसिकता नाही, त्यामुळे कामगारांना ये-जा करण्याकरिता पासेस द्यावेत

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरी टेक्स्टाईल इंडस्ट्री सध्या ठप्प आहे. लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर देशभरातील हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मोठी मागणी येत आहे. सोलापुरातील टेक्स्टाईल कारखाने बंद असल्याने मागणीनुसार पुरवठा होईना. काही कारखानदारांनी मनपाची परवानगी घेऊन ‘स्टे इन’ च्या धर्तीवर उत्पादन सुरू केले. पण यंत्रमाग कामगार कारखान्यात थांबायला तयार नाहीत, त्यामुळे पुन्हा सुरू झालेले कारखाने बंद झालेत. ‘स्टे इन’ ची अट रद्द करा, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे.

सोलापुरातील टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद असल्याने जवळपास पन्नास हजार कामगार घरीच बसून आहेत. एक हजारांहून अधिक कारखाने बंद आहेत. औद्योगिक वसाहती सुरु करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनी मनपा प्रशासनाकडे कारखाने सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. बहुतांश टेक्स्टाईल कारखानदारांनी आॅनलाईन अर्ज देखील दाखल केले. प्रशासनाकडून ‘स्टे इन’ ची अट घालण्यात आली आहे. 

कारखान्यात काम करणारे कामगार कारखान्यातच रहावेत. ते घरी जाऊ नयेत, अशी अट प्रशासनाने घातली आहे. काही कारखानदारांनी कामगारांना कारखान्यात ठेवून घेण्याची तयारी दर्शवली, पण यास कामगारांनी नकार दिला आहे. कारखान्यात थांबण्याची कामगारांची मानसिकता नाही, त्यामुळे कामगारांना ये-जा करण्याकरिता पासेस द्यावेत, अशी मागणी देखील टेक्स्टाईल कारखानदारांकडून झाली आहे. यास मनपा प्रशासन तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाने साफ नकार दिला आहे. टेक्स्टाईल कारखाने सुरू करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी ‘लोकमत’ला दिली.

...तर अर्थव्यवस्थेला फटका !- देशभरातील मोठे हॉस्पिटल सध्या सुरू आहेत. अशा हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मागणी येत आहे. काही प्रशासकीय अडथळ्यामुळे आम्हाला कारखाने सुरू करता येईनात. त्यामुळे हॉस्पिटलकडून होत असलेली मागणी पूर्ण करता येईना. या मागणीतून दोन महिन्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीला एक आशेचा किरण दिसतोय. या संधीचा वापरही आम्हाला करता येईना. दुसºया जिल्ह्यातील तसेच राज्यातील कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. सोलापुरात आज घडीला कारखाने सुरू नाही झाल्यास कारखानदार हवालदिल होतील. सोलापुरी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.  प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन टेक्स्टाईल कारखानदारांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक काशिनाथ गड्डम यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या