रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:30 IST2025-01-22T10:20:07+5:302025-01-22T10:30:51+5:30

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचं सांगत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून वारंवार केली जात आहे.

Demand for the expulsion of Ranjitsinh Mohite Patil bjp leader and minister Jayakumar Gore reaction | रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

BJP Jaykumar Gore : रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मी त्यात पडणार नाही, अशी भूमिका सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली आहे. टेंभुर्णी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. त्यांच्यासमवेत भाजप नेते आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. 

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, "प्रकाश पाटील नेमके कुठल्या पक्षाचे हेच कळत नाहीत. मात्र, आम्ही २००९ पासून आम्ही एका विचाराने एकत्र आलो असून, हा कार्यक्रम राजकीय नाही. सर्वांना बरोबर घेऊन सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार करणार आहे. जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ नेतेमंडळी असून त्यांना विचारात घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे. विकासकामांत राजकारण करणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील विमानतळ, स्थलांतर, पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार आहे," असा शब्द जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचं सांगत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून वारंवार केली जात आहे. याबाबत भाजपकडून आगामी काळात काय भूमिका घेण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Demand for the expulsion of Ranjitsinh Mohite Patil bjp leader and minister Jayakumar Gore reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.