मसले चौधरीच्या सरपंचपदी दीपक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:00+5:302021-03-10T04:23:00+5:30
नरखेड : मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपक पोपट चव्हाण यांची, तर उपसरपंचपदी रमेश प्रभाकर सिरसट ...
![Deepak Chavan as Sarpanch of Masale Chaudhary | मसले चौधरीच्या सरपंचपदी दीपक चव्हाण Deepak Chavan as Sarpanch of Masale Chaudhary | मसले चौधरीच्या सरपंचपदी दीपक चव्हाण](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/solapur-marathi-default-image-0_202012528121.jpg)
मसले चौधरीच्या सरपंचपदी दीपक चव्हाण
नरखेड : मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपक पोपट चव्हाण यांची, तर उपसरपंचपदी रमेश प्रभाकर सिरसट यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अनुजा काटुटे यांनी ही निवड जाहीर केली.
सरपंच पदासाठी चव्हाण यांचा, तर उपसरपंच पदासाठी सिरसट यांचा एकमेव अर्ज आला होता. ग्रामसेवक दगडू लवळे, तलाठी सचिन तराटे यांचे सहकार्य लाभले. मसले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हणमंत पोटरे, विजयकुमार सिरसट, गुणवंत पोटरे यांच्या लोकनेते ग्रामविकास पॅनलने सर्व पक्षीय जनशक्ती पॅनलचा पराभव करून ९पैकी ६ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. सरपंच, उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हणमंत पोटरे, राजकुमार पोटरे, ज्ञानेश्वर कोळी, विजयकुमार सिरसट, बशीर शेख, प्रमोद सिरसट, भास्कर पाटील, जहांगीर शेख, बापू भोसले, सुरेश लामकाने, तुकाराम सिरसट, दता पाटुळे, मारुती जगताप, संतोष पवार, अविनाश जगताप, किरण लंबे, सोमनाथ देशमुख, शंभुदेव भोसले उपस्थित होते.
--
०९ दीपक चव्हाण
०९ रमेश सिरसट