शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीने घेतला निर्णय; फौजदारपदासाठी मैदानी गुण फक्त पात्रतेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:20 IST

बौद्धिक गुणवत्तेला जास्त भर आणि शारीरिक दृष्टिकोनाला कमी महत्त्व दिले जात आहे

सोलापूर : एमपीएससीने नुकतेच नवीन परिपत्रक काढले आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीत ६० गुण प्राप्त करणारा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असणार आहे, तसेच हे मैदानी चाचणीचे गुण निकालात ग्राह्य धरले जाणार नाहीत. हा निर्णय म्हणजे, बौद्धिक गुणवत्तेला जास्त भर आणि शारीरिक दृष्टिकोनाला कमी महत्त्व दिले जात आहे, असा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. यामुळे मैदानी चाचणीला वेळ देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे, असे मतही व्यक्त करीत आहेत.

मैदानी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी उमेदवार वर्षानुवर्षे घाम गाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ शारीरिक चाचणीचा सराव करण्यात खर्च करीत आहेत; पण एमपीएससीच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय गुणपुरतेच महत्त्वाचे मानले जाणार आहे आणि मैदानी गुण हे मुख्य निकालात न धरता फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण ग्राह्य धरले जाणार असून, त्यावर अंतिम निकाल यादी जाहीर केली जाणार आहे. हा निर्णय २०२० च्या भरती पासून लागू करावेत, असे सांगण्यात आले आहे.

यामुळे मैदानाचा कसून सराव करणाऱ्या उमेदवारांचा या निर्णयामुळे भ्रमनिरास झालेला आहे. या पदाची तयारी करणारे उमेदवार राहुल दिघे म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक हे पद शारीरिक दृष्टीने सुदृढ असणारे पद आहे. आयोगाने त्याचीच किंमत शून्य केली आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक हा १२ तासांपेक्षा जास्त काम करतो. उद्या आरोपींचा पिच्छा करणारा पोलीस सुदृढ नसला तर काय होईल? दरम्यान, पण या निर्णयाचा एसटीआय / एएसओ या राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

उमेदवारांचे विरोधाचे कारण

पोलीस उपनिरीक्षक पदाची तयारी करत असताना ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची तयारी कमी झालेली असते ते आपली कसर मैदानी चाचणीमधून भरून काढतात, तसेच पूर्वी १०० गुणांच्या मैदानी चाचणीचा फायदा ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना होत असे; परंतु नवीन नियमांचा फटका ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना बसणार आहे. त्यामुळे एमपीएससीने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे मत मैदानी प्रशिक्षक मिथुन पवार यांनी व्यक्त केले.

हा निर्णय घेतल्यामुळे पीएसआय या पदास योग्य शारीरिक क्षमता असणारे अधिकारी आयोगाला कसे मिळतील? निर्णय परीक्षा दोन महिन्यांवर असताना आताच का घेतला गेली ? मैदानी चाचणीचे गुण ग्राह्य न धरल्याने आता मुलांनी शारीरिक चाचणीसाठी जी २ ते ३ वर्षे मेहनत घेतली त्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावीत.

मोहम्मद जागीरदार, उमेदवार

 

पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तीन टप्प्यांत चुरस असते. या तीनपैकी एकही टप्पा क्वालिफाय न करता गुणवत्तेनुसारच मेरिट लावले पाहिजे. मुख्य परीक्षेत मेरिट प्राप्तीनंतर फिजिकल गुणवत्तेनुसारच हवे. त्यामुळे गुणवत्तेला न्याय मिळेल. गुणवत्ता ही लेखीसाठी महत्त्वाची आहे तशीच शारीरिक चाचणीसाठी महत्त्वाची आहे. मुख्य, मैदानी चाचणी आणि मुलाखत या तिन्ही परीक्षा गुणवत्तेच्या आधारेच असाव्यात जेणेकरून मेरिटला महत्त्व राहील.

-दीपंकर जगताप, उमेदवार

 

एमपीएससीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागतो. २०१८ च्या पीएसआय अंतिम निकालात बहुतांश विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत ८० च्या वर गुण होते, तर ६० गुणांच्या पात्रतेचा काय उपयोग, यामुळे मैदानी चाचणी १०० गुणांचीच असावी किंवा एसटीआय / एएसओप्रमाणे मुख्य परीक्षेनंतर अंतिम निकाल लावावेत.

अमित कोळी, उमेदवार

टॅग्स :SolapurसोलापूरMPSC examएमपीएससी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस