Death toll from a train falls on Solapur station | धक्कादायक; रेल्वेखाली पडून कर्मचाºयांचा मृत्यू, सोलापूर स्थानकावरील घटना
धक्कादायक; रेल्वेखाली पडून कर्मचाºयांचा मृत्यू, सोलापूर स्थानकावरील घटना

ठळक मुद्दे- सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली घटना- घटनेनंतर उद्यान एक्सप्रेस अर्धा तास उशिराने धावली- मयत ओहळ हे कर्मचारी पुण्याला होते कामाला

सोलापूर : गाडीत चढत असताना तोल जाऊन रेल्वेखाली पडल्याने रेल्वे कर्मचाºयाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली.

भिमराज जयराज ओहळ (वय ५३, रा़ रेणुका कॉम्प्लेक्स, कुमठा नाका, सोलापूर) असे मयत झालेल्या रेल्वे कर्मचाºयाचे नाव आहे़ याबाबत रेल्वे पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भिमराज ओहळ हे रेल्वेतील एम़ सी़ एम टेक्निशियन ग्रेड-१ मध्ये कामाला होते. त्यांची ड्युटी पुणे येथे असल्याने ते पुण्याहून सोलापूरला दररोज अप-डाऊन करत होते.

रविवारी रात्री घरी आले होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता ते पुन्हा मुंबई उद्यान एक्सप्रेस गाडीने पुण्याला निघाले होते़ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई उद्यान एक्सप्रेस गाडीत चढत असताना अचानक तोल गेल्याने ते रेल्वे खाली पडले.  त्याच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ याबाबतची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे. भिमराज ओहळ यांना पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.


 

Web Title: Death toll from a train falls on Solapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.