लसीकरणानंतर तीन महिन्याचा बालकाचा मृत्यू, पंढरपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:08 IST2018-11-21T13:04:51+5:302018-11-21T13:08:28+5:30
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील घटना

लसीकरणानंतर तीन महिन्याचा बालकाचा मृत्यू, पंढरपुरातील घटना
ठळक मुद्देसंतप्त पालकांनी बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवलाडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू, पालकांचा आरोप
पंढरपूर :- तालुक्यातील कौठाळी गावातील तीन महिन्यांच्या लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतप्त पालकांनी त्या बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला असून संबंधीत डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे .
कौठली येथील दत्तात्रय आटकळे यांच्या साडेतीन महिन्याच्या बाळाचा अंगणवाडीत वैद्यकीय पथकाने पेंटा व्हायलंटची लस दिली होती . त्या नंतर त्या बाळाला त्रास होऊन त्याचा आज पहाटे मृत्यू झाला .हा मृत्यू डाॅक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप पालकानी केला अाहे .नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे.