स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:52 IST2019-01-19T12:49:58+5:302019-01-19T12:52:35+5:30

सोलापूर : होटगी रोडवरील हत्तुरेवस्ती परिसरातील विमा प्रतिनिधी यल्लप्पा शिवप्पा सण्णके (वय ४९, रा़ मल्लिकार्जुन नगर) यांचा स्वाईन फ्लूने ...

Death of the insurance agent in Solapur by swine flu | स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू

स्वाईन फ्लूने सोलापुरातील विमा प्रतिनिधीचा मृत्यू

ठळक मुद्देयल्लप्पा शिवप्पा सण्णके (वय ४९, रा़ मल्लिकार्जुन नगर) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला़मागील १२ दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होतेत्यांच्या निधनामुळे हत्तुरेवस्तीवर शोककळा पसरली आहे

सोलापूर : होटगी रोडवरील हत्तुरेवस्ती परिसरातील विमा प्रतिनिधी यल्लप्पा शिवप्पा सण्णके (वय ४९, रा़ मल्लिकार्जुन नगर) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला़ मागील १२ दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

बारा दिवसांपूर्वी सर्दी, खोकला आजाराने ते त्रस्त झाले होते. प्रारंभी त्यांना येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ त्यांच्यावरील शर्थीचे प्रयत्न थांबल्यानंतर मागील आठ दिवसांपूर्वी अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ ते लक्ष्मी हैड्रोलिक्समध्ये काम करीत होते़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे़ ते मुळचे अक्कलकोट तालुक्यातील खानापुरचे रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे हत्तुरेवस्तीवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of the insurance agent in Solapur by swine flu