जड वाहतुकीच्या धडकेत सायकलस्वार शाळकरी मुलगी ठार; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 09:52 IST2021-07-02T09:52:22+5:302021-07-02T09:52:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

जड वाहतुकीच्या धडकेत सायकलस्वार शाळकरी मुलगी ठार; सोलापुरातील घटना
सोलापूर : जड वाहतुकीचे अपघात दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी सकाळी जोडबसव परिसरात सायकलवरून अभ्यासासाठी जाणाऱ्या एका तेरा वर्षाच्या मुलीला जड वाहतुकीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
यामुळे शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आतापर्यंत त्या मुलीची ओळख पटलेली नाही, ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.