शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

'कोरोना' चे संकट दूर व्हावे अन् जे आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:34 AM

मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना; सोलापुरात रमजान ईदचा उत्साह, हस्तांदोलन अन् गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा...!

ठळक मुद्देदरवर्षी साजºया होणाºया रमजान ईदप्रमाणे यंदाची ईद वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे ईदनिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना न भेटता व्हॉटसअप, एसएमएस, फोनव्दारे शुभेच्छा देत आहेतरमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण झाल्याने सोमवारी २५ मे रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली

सोलापूर : देशासमोर कोरोना आजाराचे सर्वात मोठे संकट आहे. हे संकट दूर व्हावे, जे आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत. या आजाराच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्योगधंदे बंद असल्याने सोलापुरातील श्रमिकांसमोर आपली उपजीविका चालविणे अवघड बनले आहे. या श्रमिकांना आर्थिक सुबत्ता लाभो. देश अधिकाधिक प्रगती करो. देशातील एकता अबाधित राहो, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आल्याची माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

दरवर्षी साजºया होणाºया रमजान ईदप्रमाणे यंदाची ईद वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना न भेटता व्हॉटसअप, एसएमएस, फोनव्दारे शुभेच्छा देत आहेत. सामुदायिक नमाज पठण न करता घरातच नमाज अदा करून देशाच्या एकतेसाठी व आरोग्य चांगले रहावे याशिवाय कोरोनापासून देशावरील संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना केली.

रमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण झाल्याने सोमवारी २५ मे रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी ईदगाह मैदानावर होणारी सामूहिक नमाज यंदाच्या वर्षी झाली नाही़ रमजान ईदची नमाज ही ईदगाहमध्ये जाऊनच अदा करण्यात येते; मात्र लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करत प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ईदची ‘चार रकात चाशत’ची ‘नफिल नमाज’ किंवा ‘दोन रकात शुकराना नमाज’ अदा केली.

ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव आपापल्या घरी गोड पदार्थ करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी क्षीरकुर्मा करून खाण्याची पद्धत आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करण्यात आली. ईदच्या एक दिवस आधी तसेच ईदची नमाज अदा करण्याच्या आधी गरजूंना मदत केली जाते. याला ‘सदके फित्र’ असे म्हणतात. यामागचा                उद्देश हा प्रत्येकाच्या घरात ईद साजरी केली जावी असा आहे. यावर्षी लॉकडाऊन असल्याने अनेक लोकांसमोर आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे सदके फित्रच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंना मदत करण्यात येत आहे.

हस्तांदोलन व गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा- सोलापुरात सकाळपासूनच रमजान ईदचा माहोल आहे. हस्तांदोलन व गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत़. शक्य होईल तितके गर्दीपासून दूर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरीच रमजान ईद साजरी करण्यात येत आहे़ रमजान ईदची खरेदी करताना काळजी घ्यावी. विविध वस्तू खरेदी न करता आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी बचत करावी. तसेच बचतीतून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस