भांडण सोडवणाऱ्याचं तोंड शेकलं; हकनाक दवाखान्यात झाला दाखल!
By रवींद्र देशमुख | Updated: January 2, 2024 19:54 IST2024-01-02T19:53:54+5:302024-01-02T19:54:11+5:30
जखमीवर उपचार सुरू असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेे.

भांडण सोडवणाऱ्याचं तोंड शेकलं; हकनाक दवाखान्यात झाला दाखल!
सोलापूर : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे गावातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सातजणांनी मिळून ‘तू का मध्ये पडलास’ म्हणून अज्ञाताने वस्तूने व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. यात त्याच्या तोंडास व सर्वांगास जखम झाली. भारत चंद्रकांत धनवडे (वय ५७, रा. वाटंबरे, ता. सांगोला) असे जखमीचे नाव आहे. ही घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली. हकनाक त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागले.
यातील जखमी भारत हा अक्षय कुटे, दत्तात्रय पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेली भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला असता पाच ते सातजणांच्या जमावाने ‘तू का भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला’ म्हणत मारहाण केल्याचे सिव्हिल पोलिस चौकीतल्या एमएलसी रजिस्टर नोंदीत म्हटले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेे. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.