कोल्ड्रड्रिंक दुकानदार महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: April 9, 2023 17:47 IST2023-04-09T17:47:15+5:302023-04-09T17:47:31+5:30

पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेचे वाईट उद्देशाने हात पकडले.

Crime against the rickshaw driver for molesting a cold drink shopkeeper by holding her hand | कोल्ड्रड्रिंक दुकानदार महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

कोल्ड्रड्रिंक दुकानदार महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

सोलापूर : पीडित महिलेलेच दुकान असून त्या आपल्या कोल्डड्रिंक दुकानात बसलेल्या असताना आरोपी रिक्षाचालकाने पीडित महिलेचा वाईट उद्देशाने हात पकडत त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मेहबूब शेख ( वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

पीडितेचे कोल्डड्रिंकचे दुकान असून तेथे आरोपी मेहबूब हा आला. त्याने पैसे देण्याच्या बहाण्याने पीडितेचे वाईट उद्देशाने हात पकडले. शिवाय त्यानंतरही तो वारंवार दुकानासमोर चकरा मारत होता. ही घटना सुरूवातीला पीडितेने घरात सांगितली नाही.

पण नंतर मात्र याबाबतची माहिती पतीला सांगितली त्यानंतर या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Crime against the rickshaw driver for molesting a cold drink shopkeeper by holding her hand