शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

योग्य उपचार मिळत नसल्याने कोरोनाबाधित सरकारी डॉक्टरचा ‘सिव्हिल’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:08 IST

आयसोलेशनमधून व्हिडिओ पाठविताच उपमुख्यमंत्री कार्यालयाचीही यंत्रणा हलली

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात कार्यरत एका पोटविकार तज्ज्ञांच्या परिवारातील सहा सदस्य कोरोनाग्रस्त आढळलेशासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ज्या अडचणींचा सामना करावा लागलाशासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याची तक्रार  त्यांनी केली, यातूनच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला

सोलापूर : कोरोनाग्रस्त डॉक्टर परिवारातील सदस्यांना योग्य उपचार न मिळाल्याने डॉक्टरच्या वडिलांचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आता कोरोनाग्रस्त आईची प्रकृतीही गंभीर असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्याची नितांत गरज असल्याची भावना सोलापुरातील एका पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केली. त्यांचा वेदनादायी व्हिडिओ पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासह राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मदतीकरिता धाव घेतली. अखेर सीरियस असलेल्या डॉक्टरच्या आईला पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत एका पोटविकार तज्ज्ञांच्या परिवारातील सहा सदस्य कोरोनाग्रस्त आढळले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या व्यथा खुद्द त्या डॉक्टरांनी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर मांडल्या.शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याची तक्रार  त्यांनी केली, यातूनच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता आईदेखील सीरियस असल्याची  व्यथा त्यांनी मांडली. आईला  मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत तसे न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. भविष्यात कोणतेही डॉक्टर आरोग्यसेवा देण्यास धजावणार नाहीत, अशी खंतदेखील त्यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केली.

अजित पवार यांच्याकडून झाली मदत- आपत्कालीन व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सुजित अडसूळ सांगतात, त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी खूप भावुक झालो आणि चिंताग्रस्तही. त्यानंतर सोलापुरातील त्या डॉक्टरांशी संवाद साधला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय सहायक सुनील मुसळे यांच्याशी आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे सर यांच्याशी बोललो. तसेच संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. अखेर पुण्याच्या एका खाजगी हॉस्पिटलकडून उपचार करण्याची तयारी दर्शवणारे पत्र मिळाले. त्यानंतर कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईला दाखल करण्यात आले आहे.

 सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले- मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी पुण्यातील त्यांच्या डॉक्टर मित्रांशी संवाद साधून कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईच्या उपचाराकरिता पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करता येईल का, याकरिता त्यांची धडपड सुरू झाली. याकरिता बारामती येथील भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ यांची देखील मदत झाली. सध्या त्या कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईवर पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच डॉक्टरांचे बंधू, वहिनी आणि पत्नी यांच्यावर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यPuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाdocterडॉक्टर