corona virus; मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 14:30 IST2020-03-12T14:10:46+5:302020-03-12T14:30:53+5:30
आरोग्य विभाग लागले कामाला; प्राथमिक तपासणी करण्यासाठी सोलापूरला आणणार !

corona virus; मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ?
ठळक मुद्दे- कोरोना व्हायरसबाबत जिल्हा प्रशासन सज्ज- आवश्यक त्या सेवासुविधा करण्यात आल्या उपलब्ध- आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे शासनाचे आदेश
पंढरपूर : पंढरपुरातून एकजण विदेशात फिरायला गेला होता. तो माघारी येताना त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे 'कोरोना व्हायरस'ने पंढरपूरकरालाही सोडले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सदर रुग्ण मॉरिशसला फिरण्यासाठी गेला होता. तो सध्या आंध्रप्रदेशवरून पंढरपूरला येत आहे. त्याला वायरस लागण झाली आहे का ? याची तपासणी करण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग कामाला लागला आहे. पंढरपूरमध्ये येताच त्याची प्राथमिक तपासणी करून सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे.