कोरोनामुळे बळीराजा दवाखान्यात अन् जनावरांसाठी खाकी जनावरांच्या गोठ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 15:06 IST2020-07-11T15:03:36+5:302020-07-11T15:06:15+5:30

अशीही माणुसकी : भुकेल्यांच्या चाºयासाठी टेंभुर्णी पोलीस धावले मदतीला..

Corona in Baliraja Hospital in Khaki Animal Barn for food! | कोरोनामुळे बळीराजा दवाखान्यात अन् जनावरांसाठी खाकी जनावरांच्या गोठ्यात !

कोरोनामुळे बळीराजा दवाखान्यात अन् जनावरांसाठी खाकी जनावरांच्या गोठ्यात !

ठळक मुद्देमाढा तालुक्यातील अकोले (बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाया व्यक्तीच्या घरात इतर कोणीही नसल्याने शेतातील जनावरे, शेळ्या व कोंबड्या यांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होताकोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील अकोले (बु) येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीचे वडील व पत्नी यांनाही शासकीय  यंत्रणेने ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. यामुळे घरात इतर कोणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवून शेतातील जनावरे, शेळ्या व कोंबड्या  यांच्या चारापाण्यासाठी टेंभुर्णी पोलीस धावून गेले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील अकोले (बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. यामुळे या व्यक्तीचे वडील, पत्नी व नोकर यांनाही शासकीय यंत्रणेने कोरोना चाचणी करण्यासाठी  कुर्डूवाडी येथील  शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 

यामुळे या व्यक्तीच्या घरात इतर कोणीही नसल्याने शेतातील जनावरे, शेळ्या व कोंबड्या यांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते. ही माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना समजताच  त्यांनी तत्काळ तीन-चार  पोलीस कर्मचाºयांना या व्यक्तीच्या शेतात पाठवून तेथील जनावरे, शेळ्या व  कोंबड्या यांच्या चारापाण्याची व्यवस्था करून मुक्या प्राण्यांना दिलासा देण्याचे काम केले़

Web Title: Corona in Baliraja Hospital in Khaki Animal Barn for food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.