ट्रॅव्हलर अन् सुटकेस बॅगा घेऊन जाणाºया कंटनेरला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 16:26 IST2020-02-22T16:25:34+5:302020-02-22T16:26:46+5:30
मोहोळ-विजयपूर महामार्गावरील घटना; लाखो रूपयांचे बॅगा जळून खाक

ट्रॅव्हलर अन् सुटकेस बॅगा घेऊन जाणाºया कंटनेरला लागली आग
सोलापूर : मोहोळ - विजयपूर महामार्गावर कुरुल येथे विजयपूरकडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाºया कंटेनरला अचानक आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी तातडीने सोलापूर महानगरपालिकाचा अग्निशमन पंप बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिकहुन चेन्नईकडे जात असलेला (एचआर ५५ झेड ८१३१) या क्रमाकांचा ट्रान्सपोर्ट कार्गो टेलर हा ट्रॅव्हलर व सुटकेस बॅगा घेऊन जात होता.
मोहोळ-विजयपूर मार्गावरील कुरूल हद्दीत या गाडीला अचानक आग लागली़ या आगीची माहिती मिळताच पोलीसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले़ याचवेळी पोलीसांनी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले़ पाण्याचा जास्तीचा फवारा करीत आग आटोक्यात आणली़ या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचेही पोलीसांनी सांगितले.