शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:32 AM

Praniti Shinde Ram Satpute : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे. प्रणिती शिंदे यांनी राम शिंदेंना पत्र लिहून उपरोधिक टोला लगावला आहे.

Praniti Shinde Ram Satpute ( Marathi News ) : सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी भाजपने काल राम सातपुते यांच्या उमेदवारीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याप्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते अशी लढत होणार आहे. दरम्यान, आज प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित भाजपच्या राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  

'शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका', राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? 'या' नेत्याने दिला इशारा

काल भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदावारांची नावे आहेत. या यादीत सोलापूर मतदारसंघासाठी आमदार राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. राम सातपुते यांच्या समर्थकांनी काल जल्लोष केला, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियार पोस्ट करत टीका केल्या जात आहे. यात बीडचे पार्सल बीडला परत पाठवूया असं म्हटलं आहे. 

आज सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी एक पत्र ट्विट करत भाजपच्या राम सातपुते यांना टोला लगावला आहे. 

प्रणिती शिंदेंचं पत्र काय?

मा. राम सातपुते जी,

'आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे. 

'तसंच ह्या उमेद्वारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते.लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

'पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असंही प्रणिती शिंदेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस