शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

अक्कलकोट तालुक्यात ३११ बुथवर भाजपला तर ४८ बुथवर काँग्रेसला मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:00 PM

सोलापूर लोकसभा निवडणुक विश्लेषण; वंचित आघाडीमुळे काँग्रेसला अधिक तर भाजपला कमी प्रमाणात फटका बसला

ठळक मुद्देअक्कलकोट तालुका तसा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो वंचित आघाडीमुळे काँग्रेसला अधिक तर भाजपला कमी प्रमाणात फटका बसला

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील ३५९ बुथपैकी ३११ बुथवर भाजपला तर केवळ ४८ ठिकाणीच काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे. भाजपला तब्बल ४७ हजार ४२९ इतके मताधिक्य मिळाले आहे. तसेच वंचित आघाडीमुळे काँग्रेसला अधिक तर भाजपला कमी प्रमाणात फटका बसला आहे. 

अक्कलकोट तालुका तसा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र पुसत चालले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून दुधनीकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी झालेली नगरपालिकेची निवडणूक वगळता आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत भाजपला मताधिक्य नव्हते. काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हेत्रे यांचे मूळ गाव असून, या गावात यंदा ५२१ मतांचे प्रथमच भाजपला मताधिक्य मिळाले आहे. 

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुरेखा काटगाव यांच्या हंद्राळ गावी भाजपला ९० मतांची लीड मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी राहणाºया सलगर  गावातसुद्धा भाजपला १ हजार २७० मतांची आघाडी आहे.

जि़ प़ चे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या गावी ९४१ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. मैंदर्गी येथे भाजपला १ हजार ४६० चे मताधिक्य मिळाले आहे. अक्कलकोट येथे ५ हजार १०० चे मताधिक्य मिळाले आहे़ भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या हन्नूर गावी २३५ मते तर जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे यांच्या शिरवळ गावी ९०० मतांचे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कुमठे गावी-३२९, तडवळ-९७१, किणी-५०८, बोरामणी-४३६, कुंभारी-२ हजार १५६, वळसंग-१ हजार ३१७, वागदरी-१ हजार १००, चपळगाव-३१८, मंगरुळ-९७०, नागणसूर-१ हजार ८९९ , माजी चेअरमन विवेकानंद उंबरजे यांच्या नेतृत्वाखाली करजगी येथे ८३९ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ३५९ बुथ असून, केवळ ४८ बुथवर काँग्रेसला जेमतेम मताधिक्य मिळाले आहे. उर्वरित ३११ ठिकाणी भाजपला मिळाले आहे. भाजपचे डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना १ लाख, २ हजार, ३२३, काँग्रेसचे शिंदे यांना ५६ हजार, ८२५, आंबेडकरांच्या वंचित आघाडीला २६ हजार ३९० असे एकूण मतदान मिळाले आहे. अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच भाजपला मताधिक्य मिळाले आहे. 

वंचित आघाडीचा फटकावंचित आघाडीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात हन्नूर, किणी, चपळगाव, चुंगी, सलगर, आचेगाव, मुस्ती, कुंभारी, ब्यागेहळ्ळी, शिरवळ, अक्कलकोट शहर आदी गावात भाजपला फटका बसला आहे तर उर्वरीत बहुतांश गावांत काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. एकूणच या निवडणुकीत भाजपला कमी तर काँग्रेसचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूर