शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

सोलापूरातील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:25 AM

लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा समारोप बुधवारी ३१ जानेवारीला पार पडला.

ठळक मुद्देसोलापूरच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मंत्री सुभाष देशमुख नेहमीच आग्रही असतात : ओमप्रकाश शेटे लोकमंगलने नागरिकांना छत्रपतींचे चरित्र समजून घेण्याची संधी दिली : ना. सुभाष देशमुखमहानाट्याचे निर्माता व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांचाही ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा समारोप बुधवारी ३१ जानेवारीला पार पडला.या समारोपीय समारंभाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सोनवणे, आमदार मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, नागपुरातील उद्योजक प्रशांत पवार, अमोल पाटील, शिशिर दिवटे, रोहन देशमुख, अमित देशमुख, इंद्रजित पवार, शहाजी पवार, सुधीर खरटमल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी लोकमंगलच्या या आयोजनाचे कौतुक केले. या आयोजनातून लोकमंगलची जनप्रबोधनासाठी असलेली धडपड दिसून येते. सोलापूरच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मंत्री सुभाष देशमुख नेहमीच आग्रही असतात, असेही ते म्हणाले.राजा माने म्हणाले, ना. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील लोकमंगलने नागरिकांना छत्रपतींचे चरित्र समजून घेण्याची संधी दिली. त्यातून नव्या पिढीचे उत्तम प्रबोधन करून इतिहास मांडण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. आमदार शिवाजीराव नाईक यांनीही यावेळी समयोचित भाषण केले. यावेळी सर्व पाहुण्यांचा तलवार आणि भेटवस्तू देऊन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. महानाट्याचे निर्माता व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांचाही ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.या महानाट्यात सोलापुरातील १४५ कलावंतांचा सहभाग होता. त्यापैकी विघ्नेश कुंटम, सुचिता मदने, अभिजित भडंगे, मुक्ताई धाराशिवकर, ऐश्वर्या नंदूरकर, ओम पाटील या सहा कलावंतांचा प्रयोगाच्या मध्यंतरादरम्यान प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रयोगाचा हा अखेरचा दिवस होता. या सहा दिवसात तीन खासदार, २६ आमदार यांच्यासह ५५ मान्यवर पाहुण्यांनी या नाट्यप्रयोगाला उपस्थिती लावली. चंद्रग्रहणाचा दिवस असूनही प्रेक्षागारात अलोट गर्दी होती. 

टॅग्स :Solapurसोलापूर