Dj वाजीव तुला आईची शपथ हाय... नवरदेवासह डीजेमालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 11:08 IST2019-01-15T10:51:12+5:302019-01-15T11:08:34+5:30
वरातीमध्ये डीजेवर लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे मालक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Dj वाजीव तुला आईची शपथ हाय... नवरदेवासह डीजेमालकावर गुन्हा दाखल
सोलापूर : वरातीमध्ये डीजेवर लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे मालक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
रविवारी दुपारी सिध्दार्थनगर भागात वाघमारे कुटुंबियात लग्न सोहळा होता. लग्नाच्या अगोदर नवरदेवाची गावातून डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली. वाटेत करमाळा न्यायाधीश यांच्या निवासस्थानासमोर उडत्या चालीच्या कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर नवरदेवाचे मित्र जोरजोरात नाचू लागले.
लग्न समारंभ म्हटलं की डीजे, बँड बाजा आलाच. तर डीजेवर नाचणारी मित्रमंडळी, कर्णकर्कश आवाज आणि गाणी हेही ठरलेलचं. सोलापूरच्या करमाळा येथे एका नवरदेवाच्या वरातीमध्येही डीजेवर अशीच गाणी लागली होती. डीजेवरील या गाण्यासमोर नवरदेवाचे मित्र, कार्यकर्ते जोशात नाचत होते. मात्र, चक्क करमाळा न्यायाधीशांच्या निवास्थानासमोर नवरदेवाच्या मित्रांचा हा दंगा न्यायाधीश महोदयांना असह्य झाला. त्यामुळे, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून डीजे मालक मन्सूर बशीर शेख (रा. कविटगाव ता. करमाळा) आणि नवरदेव चंद्रशेखर दीपक वाघमारे (रा सिध्दार्थनगर करमाळा) व डीजे चालक या तिघांविरोधात भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.