सोलापूर महानगरपालिकेची २८ बँक खाती बंद, आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:11 PM2018-07-15T17:11:40+5:302018-07-15T17:12:48+5:30

हिशोबासाठी होणार सोय : मिळकत कर भरण्यासाठी १३ ठिकाणी सुविधा

The closure of 28 bank accounts of Solapur Municipal Corporation, Commissioner's decision | सोलापूर महानगरपालिकेची २८ बँक खाती बंद, आयुक्तांचा निर्णय

सोलापूर महानगरपालिकेची २८ बँक खाती बंद, आयुक्तांचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देजीआयएस सर्वेक्षणाद्वारे तपासणी केलेल्या मिळकतींची फेरतपासणीमिळकतींच्या करप्रणालीत सुधारणा होणारगरजेची खाती ठेवून २८ बँक खाती बंद करण्यात आली

सोलापूर : महापालिकेच्या येणाºया-जाणाºया पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी २८ बँक खाती बंद करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी  दिली. 

महापालिकेच्या विविध खात्यांतर्गत जमा होणाºया रकमा व विविध योजनांसाठी काढण्यात आलेली ९0 बँक खाती होती. इतक्या बँक खात्यांचा वेळोवेळी हिशोब ठेवणे अशक्य होत होते. त्यामुळे गरजेची खाती ठेवून २८ बँक खाती बंद करण्यात आली आहेत. युसीडीच्या खात्यावरून यापूर्वी परस्पर रक्कम काढण्यात आली होती. असे प्रकार टाळण्यासाठी सर्व खात्यांवर एकाचवेळी नियंत्रण राहावे यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. शासनाकडून नवीन योजना आल्यावर त्या योजनेच्या नावे खाते काढावे लागते. त्यामुळे त्या त्या विभागामार्फत संबंधित बँक खात्याच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवले जाते. मुख्य लेखापाल कार्यालयाकडून या खात्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. 

मिळकतकर विभागात मागील आर्थिक वर्षात मार्चअखेर कर्मचाºयांमार्फत कर जमा करण्यात आला. अशा ३0 हजार प्रकरणांची संगणकीय विभागात नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे चालू वर्षीच्या बिलात ही थकबाकी आली. अशी चुकीची बिले गेल्याने नागरिक हैराण झाले. त्यामुळे अशा बिलात दुरूस्ती करून नव्याने बिले देण्यात येत आहेत. या समस्येमुळे बिल देण्यास उशिरा झालेल्यांना ५ टक्के सवलत देण्याचा लाभ मिळण्यासाठी संगणकात बदल करून सोय करण्यात आली आहे. आता कच्ची पावती बंद केल्यामुळे महापालिकेच्या संगणक विभागात दररोज रांगा लागत आहेत.

सर्वसामान्य लोकांना आॅनलाईन कर भरणा करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेमार्फत विभागीय कार्यालये व इतर अशा १0 ठिकाणी करसंकलन जमा करण्याची केंद्रे उघडण्यात येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेनेही तीन शाखांमध्ये महापालिकेचा कर जमा करून घेण्याची सोय उपलब्ध करण्याचे मान्य केले आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे युको बँकेत खाते आहे. गरज भासल्यास कंपनीचे इतर शाखेत खाते काढण्याचा प्रस्ताव आहे. 

जीआयएसचा लाभ होणार
- जीआयएस सर्वेक्षणाद्वारे तपासणी केलेल्या मिळकतींची फेरतपासणी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मिळकतींच्या करप्रणालीत सुधारणा होणार आहे. संबंधित ठेकेदाराकडून आहे त्या यंत्रणेत हे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. 

Web Title: The closure of 28 bank accounts of Solapur Municipal Corporation, Commissioner's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.