उद्यापासून सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीचे वर्ग भरणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:44 IST2021-11-30T15:39:14+5:302021-11-30T15:44:19+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

उद्यापासून सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीचे वर्ग भरणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
सोलापूर : उद्या बुधवार 1 डिसेंबर पासून जिल्ह्यातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्यामुळे उद्या शाळेची पहिली घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे.
मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलं घरीच आहेत. पण सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा शाळा सुरू होण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे साेलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंत सर्वच शाळा सुरू होणार आहे.