शहर मध्यमध्ये शिवसेना वारंवार अपयशी, आता भाजपकडून आमचा दावा राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:58 PM2019-09-26T12:58:10+5:302019-09-26T12:59:54+5:30

पालकमंत्री विजयकुमार देशमुख; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले जोरदार शक्तिप्रदर्शन

In the city center, the Shiv Sena has repeatedly failed, and now our claim will be from the BJP | शहर मध्यमध्ये शिवसेना वारंवार अपयशी, आता भाजपकडून आमचा दावा राहणार

शहर मध्यमध्ये शिवसेना वारंवार अपयशी, आता भाजपकडून आमचा दावा राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमीमागच्या निवडणुकीत शिवसेना तिसºया क्रमांकावर होतीभाजपने मात्र या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी होत गेली आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. भाजपने मात्र या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. या मतदारसंघात भाजपचे १८ नगरसेवक असल्याने यावर भाजपच दावा करणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाºयांचा मेळावा बुधवारी सायंकाळी मर्दा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, शशी थोरात, अनंत जाधव, चंद्रकांत रमणशेट्टी, पांडुरंग दिड्डी, महिला अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, विस्तारक प्रकाश म्हंता, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश वल्याळ, मोहिनी पत्की, मंगला पाताळे, परिवहन सदस्य जय साळुंखे, रामचंद्र जन्नू आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

देशमुख म्हणाले, युतीचे जागावाटप दोन दिवसांत निश्चित होईल. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी होत आहे. दुसरीकडे भाजपची वाढत आहे. शहर मध्य मतदारसंघावर भाजप दावा करणार आहे. सर्वांनी गटतट विसरुन काम करायला हवे.
 विक्रम देशमुख म्हणाले, भाजपचे या मतदारसंघातील काम इतर मतदारसंघाच्या तुलनेत अतिशय चांगले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा. 

यावेळी नागेश वल्याळ यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. शहर मध्य मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली.

मेळाव्याला बसवराज गदगे, संदीप जाधव, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, पिंटू महाले, मल्लेश सरगम, हिरालाल पिसे, अरविंद साका, गंगाधर गुल्लापल्ली, भीमाशंकर जावळे, सिद्धार्थ मंजेली, संध्या सिद्धम, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, श्रीकांचना यन्नम, राधिका पोसा आदी उपस्थित होते.

प्रणिती शिंदेंची दादागिरी मोडीत काढणार - जाधव 
- आमदार प्रणिती शिंदे यांचा पराभव अटळ असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून त्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. त्यांची दादागिरी मोडीत काढू. शिंदे यांनी मतदारसंघात मेकअपचे बॉक्स वाटण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीचा मेकअप करावा. सहानुभूती मिळविण्यासाठी खटाटोप करु नये, अशी टीकाही जाधव यांनी केली. 

Web Title: In the city center, the Shiv Sena has repeatedly failed, and now our claim will be from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.